मुंबई : हवामानातील बदलामुळे आरोग्यावर आणि त्वचेवरही परिणाम दिसून येऊ लागतो. यामध्ये पायाला भेगा पडण्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे पायाची आग होणं, पाय जळजळणं या त्रासांनाही सामोर जावं लागतं. पायांच्या भेगांवर वेळीच उपचार करणं शक्य आहे. पायाच्या भेगा पडायला सुरुवात झाल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या लोकांना ही समस्या अधिक आहे. त्यांना पाय दुखणं आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
या उपायांनी टाचेला पडणाऱ्या भेगांवर उपचार करा
एप्पल सायडर विनेगर टाचेला भेगा पडण्याची समस्या दूर करण्यात मदत करते. जर यात लिंबाचा रस मिक्स केला गेला तर त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. या दोन्हीमध्ये अँटी-इंफ्लामेटरी आणि आम्लीय घटक असतात. जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरफडमध्ये हायड्रेटिंग आणि उपचार हा गुणधर्म असतो. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. त्यात ग्लिसरीनचा वापर केल्यास पाय चांगले मॉइस्चराईझ केले जातात. हे कोरडे आणि भेगा पडलेल्या त्वचेसाठी प्रभावी आहे.