लसीचे 2 डोस घेतलेल्यांना Omicron ची 'ही' लक्षणं दिसून येतायत

ओमायक्रॉन व्हेरिएंट तितका घातक नसला तरी प्रकरणांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.

Updated: Jan 20, 2022, 11:46 AM IST
लसीचे 2 डोस घेतलेल्यांना Omicron ची 'ही' लक्षणं दिसून येतायत title=

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसतोय. दररोज दोन लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होतेय. दरम्यान कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणंही वाढतायत. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाही या व्हेरिएंटची लागण होतेय. हा व्हेरिएंट तितका घातक नसला तरी प्रकरणांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.

कोरोना प्रतिबंधक लस व्हायरस विरोधात विशिष्ट स्तरावरील संरक्षण प्रदान करतात. अभ्यासात असं दिसून आलंय की, लसीचा एक डोस किंवा पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. परंतु जर कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीला लक्षणं दिसत नाहीत किंवा फार सौम्य लक्षणं दिसून येतात.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉनची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सर्दीसारखी लक्षणं दिसतात. आणि ते स्वतःच बरे देखील होतात. 
त्याचप्रमाणे घसा खवखवणे याशिवाय ओमिक्रॉनच्या इतर काही लक्षणांमध्ये थकवा, ताप, अंगदुखी, रात्री घाम येणं, शिंका येणं, नाक वाहणं, मळमळ तसंच भूक न लागणं या लक्षणांचाही समावेश आहे. 

ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर घसा खवखवण्याचा त्रास होतो. शिकागोचे सार्वजनिक आरोग्य आयुक्त डॉ अॅलिसन अरवाडी म्हणाले, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी घसा खवखवण्याच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.