मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी या '6' गोष्टींचं भान ठेवा

फॅशन इंडस्ट्रीमध्ये रोजच नवनवे बदल होत असतात. 

Updated: May 9, 2018, 04:28 PM IST
मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी या '6' गोष्टींचं भान ठेवा   title=

मुंबई : फॅशन इंडस्ट्रीमध्ये रोजच नवनवे बदल होत असतात. काही वर्षांपासून ग्लॉसी किंवा काही ठराविक रंगाच्याच लिपस्टिक लावल्या जात असे. मात्र सध्या 'मॅट लिपस्टिक'ची चलती आहे. मॅट आणि गडद रंगाच्या लिपस्टिक्स गोर्‍या मुलींना खूपच खुलून दिसतात. पण मॅट लिपस्टिक लावताना काही चूका टाळणं गरजेचे आहे. 

ओठांना स्क्रब करा - 

मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना स्क्रब करणं गरजेचे आहे. यामुळे ओठांवरील डेड स्किनचा थर निघून जातो. त्यावर मॅट लिपस्टिकचा थरही उत्तम बसतो. 

लिप बाम लावावा - 

मॅट लिपस्टिक ही ओठांना शुष्क करते. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बामचा थर अवश्य लावावा. यामुळे ओठ मुलायम राहण्यास मदत होते. 

ब्रशने नव्हे तर ट्युबने लावा लिपस्टिक - 

मॅट लिपस्टिक शुष्क असते त्यामुळे ब्रशने त्याचा ओठांवर वापर करणं टाळा. जर लिपस्टिक खूपच ड्राय असेल तर त्यावर ब्लो ड्रायर फिरवा. यामुळे लिपस्टिक थोडी विरघळायला मदत होते. 

ओठांवर घासू नका - 

लिपस्टिक ओठांवर नीट स्थिर व्हावी म्हणून तुम्ही त्यांना घासून लावत असाल ते टाळा. ग्लॉसी किंवा शिअर लिपस्टिक पेक्षा मॅट लिपस्टिक शुष्क असते त्यामुळे मॅट लिपस्टिक ओठांवर लावणं त्रासदायक ठरू शकतं. 

दोन कोट लावा - 

मॅट लिपस्टिक लवकर खराब होऊ शकते. ती शुष्क असल्याने ओठांवर सहज भेगा पडल्यासारखे दिसते. म्हणूनच ओठांवर लिपस्टिकचे दोन कोट लावावेत. 

लिप लायनर - 

मॅट लिपस्टिकला सुंदर बनवण्यासाठी आऊटलाईनिंग करणं आवश्यक आहे. याकरिता लिपस्टिकच्या शेडनुसारच लिप लायनरचीही निवड करा. लिप लायनरमुळे लिपस्टिक अधिक वेळ टिकण्यास मदत होते.