मुदतपूर्व प्रसुतीची 'ही' लक्षणं दिसून येऊ शकतात, पाहा कारणं काय आहे?

गर्भधारणेच्या 24 ते 34 आठवड्यांमध्ये (अर्ली प्रीटर्म) आणि 34 ते 37 आठवडे (लेट प्रीटर्म) दरम्यान गर्भाशयाचे मुख उघडते तेव्हा अकाली प्रसूती होते आणि त्यात अकाली मूल जन्माला येते.

सुरभि जगदीश | Updated: May 30, 2024, 01:58 PM IST
मुदतपूर्व प्रसुतीची 'ही' लक्षणं दिसून येऊ शकतात, पाहा कारणं काय आहे? title=

मुदतपूर्व प्रसुती हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. दरवर्षी लाखो बाळांचा अकाली जन्म होत होतो. गर्भधारणेच्या 24 ते 34 आठवड्यांमध्ये (अर्ली प्रीटर्म) आणि 34 ते 37 आठवडे (लेट प्रीटर्म) दरम्यान गर्भाशयाचे मुख उघडते तेव्हा अकाली प्रसूती होते आणि त्यात अकाली मुल जन्माला येते. जितक्या लवकर बाळाचा अकाली जन्म होईल तितका जास्त आरोग्याविषयक धोका अधिक असतो. अनेक अकाली जन्मलेल्या बाळांना नवजात अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये विशेष दाखल करण्याची आवश्यकता भासते. मुदतपूर्व प्रसूतीचे नेमके कारण अनेकदा अज्ञात असते, आणि काही जोखीम घटक मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता वाढवू शकतात, हे गर्भवती महिलांमध्ये कोणत्याही ज्ञात जोखीम घटकांशिवाय आढळून येऊ शकते.

मुदतपूर्व प्रसूतीची काय आहेत कारणं?

जर तुम्ही अकाली बाळाला जन्म दिला असेल, जुळी अथवा तिळी असा एकाधिक गर्भ असलेल्या महिला तसंच गर्भाशयासंबंधी काही समस्या असतील तर अकाली प्रसूती होण्याची शक्यता अधिक असते. भूतकाळात योनीमार्ग, गर्भाशय मुखासंबंधी काही समस्या आढळल्यास मुदपूर्व प्रसुतीची शक्यता असते.

लक्षणे कोणती?

पुण्यातील वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रसाद कुलट यांच्या सांगण्यानुसार, एका तासाच्या आत सतत कळा अनुभवणं जे शारीरिक स्थिती बदलल्यानंतर किंवा पुरेसा आराम केल्यावरही कमी होत नाही. पाठीच्या खालच्या भागात दुखणे जे अधूनमधून किंवा सतत असू शकते. ओटीपोटात वेदना, काहीवेळेस अतिसारासह वेदना आढळून येतात. ओटीपोटात किंवा योनीमध्ये वाढलेला दाब, सतत मासिक पाळीसारख्या वेदना येणे. योनीवाटे येणारा स्त्राव वाढणे, शक्यतो गुलाबी किंवा श्लेष्मासारखा रंग, योनीवाटे बाहेर पडणारे द्रवपदार्थ, अम्नीओटिक द्रवपदार्थ, योनीवाट रक्तस्त्राव, फ्लू सारखी लक्षणे जसे की मळमळ आणि उलट्या आणि गर्भाच्या हालचाली कमी होणे ही काही चिन्हे आहेत.

विविध कारणांमुळे मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढू शकतो, जसं की पूर्वीच्या मुदतपूर्व प्रसूतीचा किंवा अकाली जन्मलेल्या बाळाचा वैद्यकीय इतिहास, एकापेक्षा जास्त गर्भधारण करणं, गर्भाशय मुख लहान होणं, गर्भाशयाच्या किंवा प्लेसेंटल समस्या, धूम्रपान किंवा बेकायदेशीर औषधांचा वापर करणे, काही संक्रमण, उच्च रक्तदाब यांसारख्या जुनाट परिस्थिती आणि मधुमेह, धकाधकीच्या जीवनातील घटना, अति अम्नीओटिक द्रवपदार्थ, गर्भधारणेदरम्यान योनीतून रक्तस्त्राव, गर्भाच्या जन्मातील दोष आणि गर्भधारणेदरम्यानचे विशिष्ट अंतर.

गुंतागुंत कशात असते?

डॉ. प्रसाद यांच्या सांगण्यानुसार, अकाली बाळाचा जन्म होणं, ज्यामुळे कमी वजन, श्वसनविषयक आव्हानं, अविकसित अवयव आणि दृष्टीदोष यासारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अकाली जन्मलेल्या मुलांनाही सेरेब्रल पाल्सी, शिक्षणात अडचणी आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांची शक्यता असते.

मुदतपूर्व प्रसुती व्यवस्थापन कसं करावं?

तणावाचे व्यवस्थापन करणारे मेडिटेशन आणि विश्रांती तंत्राचा अवलंब करणे जे मुदतपूर्व प्रसूतीचा अनुभव घेणाऱ्या फायदेशीर ठरते.  तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करणे व तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे. संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि धूम्रपान आणि अवैध औषधांसारखे हानिकारक पदार्थ टाळणे स्त्रियांसाठी फायदेशीर आहे.