आतड्यांमध्ये मल सुकताच शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, 4 आयुर्वेदिक उपायांनी बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

आयुर्वेद तज्ज्ञ यांनी आपल्या आतड्यांमध्ये मल सुकताच कोणते लक्षणं दिसतात आणि या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी 4 आयुर्वेदिक सांगण्यात आलेय. 

नेहा चौधरी | Updated: May 30, 2024, 12:11 PM IST
आतड्यांमध्ये मल सुकताच शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, 4 आयुर्वेदिक उपायांनी बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम title=
symptoms of stool dries in the intestines 4 ayurvedic remedy to improve gut health news in marathi

खराब आहार, बिघडलेली जीवनशैली, तणाव, काही औषधांचं सेवन, फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन, रिफाइंड पिठाचे अतिसेवन यामुळे बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते. हा आजार जगात प्रत्येकाला कधी ना कधी होतो. बद्धकोष्ठता म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मल बाहेर येतं त्यामुळे सतत पोटदुखीची समस्या होते. दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमध्ये मल जमा होतो आणि तो सडण्यास सुरुवात होते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. 

जर आपल्या दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आणि तुमच्या आतड्यामध्ये मल जमा होतो याची लक्षणं शरीरात दिसतात. तुम्हाला पोटात वारंवार दुखणे, मळमळ किंवा उलट्या होणे, थकवा जाणवणे, नैराश्य किंवा चिडचिड वाटणे, पोटात जड होणे आणि भूक न लागणे, पोटात दुखणे आणि पेटके येणे यासारखी लक्षणं दिसून येतात.  

मोठे आतडे मलमधून जास्त पाणी शोषून घेते त्यामुळे मल कोरडा आणि कडक होतो. अशा स्थितीत तो शरीरातून बाहेर पडू शकत नाही आणि तो आतड्यात साचण्यास सुरुवात होते. जेव्हा हा मल जास्त दिवस आतड्यात साचून राहतो आणि तो कुजतो तेव्हा शरीरात अनेक समस्या दिसून येतात. 

आयुर्वेद तज्ज्ञानुसार ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत त्यांनी ताबडतोब उपाय घेणं गरजेच आहे. बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो असं आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलं. 

हेसुद्धा वाचा - 'ही' सुकलेली पानं करतील Uric Acid ला फिल्टर, असा करा त्यांचा उपयोग

बडीशेप दुधासोबत सेवन!

तज्ज्ञांच्या मते, एक ग्लास दूध घेऊन ते उकळण्यासाठी ठेवावं. त्यात एक चमचा ठेचलेली बडीशेप घालून ती चांगली उकळा. हे दूध उकळल्यानंतर गाळून घ्या आणि त्यात साखरेऐवजी गूळ घालून याचं सेवन करा. 

दुधासोबत हळद आणि काळी मिरी यांचं सेवन!

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि 3-4 काळी मिरी एक ग्लास दुधात मिसळून उकळून त्याच सेवन करा. 

एलोवेरा जेलचे सेवन!

जर तुम्हाला बद्धकोष्ठता दूर करायची असेल आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ करायची असेल तर तुम्ही एलोवेरा जेलचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. एलोवेरा जेलचे पान तोडून त्यातून जेल काढा आणि दोन चमचे म्हणजे 25 मिली एलोवेरा जेलचे सेवन केल्यास आतड्यांमधली घाणही साफ होण्यास मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी याचं सेवन केल्याने शरीराला मॅग्नेशियम प्राप्त होतं. आतडे मऊ होतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, असं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

पचण्यास हलके भाज्यांचा सेवन करा!

उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी सहज पचणाऱ्या भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरतं. भाज्यांमध्ये टिंडा, झुचीनी, भोपळा, सलगम, फरसबी आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने फायदा होतो. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)