‘ही’ फळं खा आणि टीकवा त्वचेचं सौंदर्य

रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. 

Updated: Sep 23, 2018, 01:16 PM IST
‘ही’ फळं खा आणि टीकवा त्वचेचं सौंदर्य title=

मुंबई : वाढतं वय आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल या साऱ्याच्या हल्लीच्या जीवनशैलीत बराच विचार केला जातो. मुख्य म्हणजे अनेकजण आपल्या वाढत्या वयाचा थेट परिणाम हा सौंदर्यावर, परिणामी त्वचेवर होणार, या चिंतेनेसुद्धा त्रस्त असतात. याच चिंता आणि या तणावापासून दूर राहण्यासाठी मग सुरुवात होते ती म्हणजे विविध उपाय शोधण्याची. महागडी औषधं या अनेकांचाच शेवटचा पर्याय असतोत. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. चला तर, जाणून घेऊया ही फळं नेमकी आहेत तरी कोणती याविषयी...

सफरचंद-

सफरचंदामध्ये असणारा एन्झामाईन नावाचा घटक त्वचेचा तजेला कायम राखण्यास मदत करतं. त्वचेला एक वेगळी चमकही सफरचंदामुळेच मिळते. ‘अॅन अॅपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे’ असं नेहगमीच म्हटलं जातं. त्वचेच्या बाबतीतही असंच काहीसं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

पपई

त्वचा उजळण्यासाठी पपईचं सेवन करणं कधीही उत्तम. रोजच्या रत पपईचा समावेश केल्यास चेऱ्यावरील सुरकुत्या, डाग इत्यादीपासून तुमची सुटका होऊ शकते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. या घटकांमुळे त्वचेचं सौंदर्य कायम राहण्यास मदत होते. तसंच त्वचेतील कोलेजन वाढण्यासही स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरतात.

किवी-

सहसा डेंग्यू या आजारावर उपाय म्हणून खाल्लं जाणारं किवी हे फळ आता अनेकांच्या आवडीचं झालं हे. डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल, चेहऱ्यावरील सुरकुत्या यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कीवीतील अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात. या फळात असणारं ई आणि क ही जीवनसत्व वाढतं वय लपवण्यास उपयुक्त ठरतात.

कलिंगड- 

शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी कलिंगडाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. मुख्य म्हणजे सौंदर्याची अर्धीअधिक मदार ही त्वचेवर असते आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी पाणीही तितकच गरजेचं असतं. परिणामी चिरतरुण सौंदर्यासाठी कलिंगड़ खाणं खूप फायद्याचं ठरतं.