'ही' आहेत लसीकरणानंतर दिसून येणारी कोरोना संक्रमणाची लक्षणं

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण होताना दिसतेय.

Updated: Jul 14, 2021, 09:33 AM IST
'ही' आहेत लसीकरणानंतर दिसून येणारी कोरोना संक्रमणाची लक्षणं title=

मुंबई : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण होताना दिसतेय. यामध्ये अधिकतर प्रकरणं डेल्टा वेरिएंटची दिसून येतायत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, लसीचा डोस हा मृत्यू आणि गंभीर आजारी पडण्यापासून संरक्षण देतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख सायंटीस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या सांगण्यानुसार, लस घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टा वेरिएंटचं संक्रमण होण्याची प्रकरणं अधिक समोर येत आहेत.

डॉ. सौम्या म्हणाल्या, रूग्णालयात दाखल करण्याची गरज ज्या ठिकाणी लसीकरण कमी झालंय तिथे आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशनच्या अनुसार, रूग्णालयात दाखल आणि मृत्यूची 75 टक्के प्रकरणं वयाच्या 65 वर्षांपेक्षा जास्त आहेत.

लस घेतलेले लोकं जर सुरक्षित असतील याचा अर्थ असा नाही की त्यांना इन्फेक्शन होणार नाही. मुख्य म्हणजे अशा लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत आणि त्यांच्यात लवकर इन्फेक्शन पसरतं. त्यामुळे मास्क लावणं आणि सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचं असल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

काही अभ्यासांचा असा दावा आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये व्हायरस कमी प्रोड्यूस होतो. यामुळे व्हायरस इतर व्यक्तींमध्ये सहजतेने पसरू शकत नाही. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी अजून अभ्यास गरजेचा आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर दिसणारी लक्षणं

अहवालानुसार, लसीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना संक्रमण झालं तर डोकेदुखी, नाक गळणं, घसा खवखवणं, शिंका अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं कोरोनाच्या लक्षणांसारखीच असतात.

दुसरा डोस घेतल्यानंतर दिसणारी लक्षणं

जर एखाद्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असतील आणि तरीही संसर्ग झाल्यास त्याला डोकेदुखी, नाक गळती, शिंका येणं, घसा खवखवणं आणि यांसारखी लक्षणं दिसू शकतात.