मिठीत घेण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...

पण तुम्हाला माहितीये का आपल्याला येणाऱ्या याच नैसर्गिक भावनेचा आपल्या आरोग्यला खूप फायदा होतो.   

Updated: Oct 5, 2022, 07:25 PM IST
 मिठीत घेण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...  title=

Health Benefits of Hugging: कुणालाही मिठीत घेतल्यावर किंवा कुणाच्या मिठीत गेल्यावर आपल्याला एका वेगळ्या अनुभवाची जाणीव घेतो. आपल्याला रडू आलं की आपल्याला कुणाच्या तरी मिठीत जावंंसं वाटतं तर आपल्याला कधी खूपच आनंद झाला की आपल्याला तेव्हाही कुणालातरी मिठीत घ्यावसं वाटतं. आपली येणारी ही भावना खूप वेगळी आहे. ती आपण शब्दात मांडूच शकत नाही. (these are health benefits of hugging health tips lifestyle news)

पण तुम्हाला माहितीये का आपल्याला येणाऱ्या याच नैसर्गिक भावनेचा आपल्या आरोग्यला खूप फायदा होतो. तुम्हाला माहितीये का की मिठीचा तुम्हाला कसा फायदा होतो ते? तेव्हा जाणून घेऊया मिठीचे चमत्कारिक फायदे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार दिवसाला चार वेळा तरी मिठी मारणं आवश्यक आहे. 

काही अभ्यासातून असंही लक्षात आलंय की आपल्या मिठीचा आपल्या मेंदूवर खूप सकारात्मक परिणाम होत असतो. कडन्डलिस्ट नावाचा नवा पेशा, उद्याेगही विकसित झाला आहे. 

हृदय फीट राहते - (Keeps your heart healthy) आपल्या हृदयासाठी मिठी मारणं अत्यंत फायदेशीर आहे. शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टीसोल रक्तदाब वाढवण्याचं काम करतात. ज्यामुळे हृदयाचे विकार होण्याची शक्यता उद्भवते. परंतु मिठी मारल्यामुळे तुमच्यातील कॉर्टीसोलचं प्रमाण कमी होतं आणि तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहता. 

पार्टनरशी अधिक कनेक्ट होता येते - (Connnets you through your partner) पार्टनरसोबत आपलं लाईफ उत्तमरीत्या जावं असं वाटतं असेल तर किसिंग, हगिंगसारखे पर्याय महत्त्वाची भुमिका बजावतात. या गोष्टी आपल्या पार्टनरसोबत करणं आवश्यक आहे कारण यानं आपल्या पार्टनरसोबतच आपलं नातं अधिकच दृढ होतं. 

तणाव कमी होतो - (Reduces Stress) मिठी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावापासून दूर राहता येतं. शिवाय एकटेपणाही सतावत नाही. आपण जेव्हा कोणाला मिठी मारतो तसेच यामुळे मानसिक शांतता मिळते. 

रागावर नियंत्रण राहते - (Controls your anger) आपली अनेकदा अनेक कारणांवरून चिडचिड होत असते, अनेकदा आपल्याला रागही येतो. कधी कधी हा राग अनावर होतो आणि आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. तेव्हा अशावेळी मिठी आपला राग कमी करण्यास मदत करते कारण अशावेळी मिठी मारल्यावर समोरच्या व्यक्तीची सकारात्मक उर्जा आपल्यात परावर्तित होते. 

खकवा दूर होतो - (Reduces your triedness) व्यक्तीला मिठी मारतेवेळी शरीरातील मांसपेशी पसरतात अशी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामुळे थकवा जाणवत असल्यास मिठी मारल्यामुळे तोसुद्धा दूर पळून जातो. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)