कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींनी अशी घ्या काळजी... WHOचा इशारा

  कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. 

Updated: Apr 27, 2020, 02:35 PM IST
कोरोनावर  मात केलेल्या व्यक्तींनी अशी घ्या काळजी... WHOचा इशारा  title=

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्याप लाखो रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनामुळे जगातील सर्वच छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत, याचा सर्वात मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे प्रत्येक देशाचे सरकार आणि आधिकारी या आलेल्या संकटावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता काही देशांमध्ये आणि राज्यांमध्ये  कोरोना  रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम देखील शिथिल होताना दिसत आहेत. 

पण ही बातमी दिलासादायक असली तरी कोरोना पुन्हा फैलू नये याची  काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा सर्वच देशांना दिला आहे. WHOने कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या  व्यक्तींना अधिक काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. कोरोनातून सुखरूप मुक्त झालेल्या व्यक्तींना लगेचच कामावर रूजू करण्यावर सरकारने विचार करावा असं WHO कडून सांगण्यात आलं आहे. 

कोरोनाच्या संक्रमनातून बाहेर आलेले व्यक्ती पुन्हा तात्काळ कामावर रुजू झाल्यास त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. परिणामी त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता देखील WHOने व्यक्त केली आहे. जगात असे देखील व्यक्ती  आहेत ज्यांना कोरोनाची लागण पुन्हा झाली आहे. असं देखील WHO ने सांगितले आहे. 

त्यामुळे कोरोना मुक्त नागरिकांनी काही दिवस स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचा इशारा WHOने दिला आहे. तर भारतामध्ये कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर पडलेल्यांचं प्रमाण २२ टक्के झालं आहे, हेदेखील इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे