पावसाळ्यात दातांची काळजी घेणे महत्वाचे

पावसाळा हा निसर्गापासूनच मनुष्यापर्यंत सर्वांनाच नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. 

Updated: Jul 14, 2019, 04:43 PM IST
पावसाळ्यात दातांची काळजी घेणे महत्वाचे title=

मुंबई : पावसाळा हा निसर्गापासूनच मनुष्यापर्यंत सर्वांनाच नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. पावसाळ्यात दंत रोग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये दात स्वच्छ ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. दात अधिक दुखत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

- वेळोवेळी आपला टूथब्रश बदलने आवश्यक आहे. त्यामुळे आपले दात स्वच्छ ठेवण्यास निश्चित मदत करते

- नियमित दात स्वच्छ करा. 

- पावसाळ्यात फळे, पेर, स्टॉबेरी, दही आणि ओटचे सेवन करा. तसेच 'व्हिटॅमिन सी' आणि 'कॅल्शियम' युक्त पोषक आहार घ्या. 

- वेळेवर दात तपासणी करा. यामुळे तुमचे दात निरोगी राहण्यास मदत होील... आणि जर काही समस्या असेल तर ते वेळीच लक्षात येईल 

- पावसाळ्यात चहा आणि कॉफी यांसारखे पेय कमी घ्या. त्यामुळे दात खराब व कमकुवत होतात. तसंच दातांचा रंग बदलतो.