Stale Chapati: शिळी चपाती खाल्ल्यामुळे आरोग्यास होतात अनेक फायदे

Stale Chapati :  आयुर्वेदात (Ayurveda) आणि डॉक्टरही (Doctor) सांगतात की, शिळं अन्न (Stale Food) खाऊ नये. मग आपण उरलेलं अन्न अनेक फेकून देतो.

Updated: Sep 14, 2022, 12:28 PM IST
Stale Chapati: शिळी चपाती खाल्ल्यामुळे आरोग्यास होतात अनेक फायदे title=
stale bread amazing benefits of eating stale chapati in nm

Stale Chapati : बदलेली जीवनशैली आणि घरातील अगदी प्रत्येक जण नोकरीसाठी (Job) घराबाहेर जातो. त्यामुळे या धकाधकीच्या व्यस्त जीवनात अनेक वेळा आपल्याला जेवण (Food)बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी आपण बाहेरून जेवण ऑर्डर (Order) करतो. पण तेही काही रोज शक्य नाही. मग आपण रात्रीचं (Night) उरलेलं दुपारी किंवा दुपारचं (Afternoon) उरलेलं जेवण रात्री खातो. 

आयुर्वेदात (Ayurveda) आणि डॉक्टरही (Doctor) सांगतात की, शिळं अन्न (Stale Food) खाऊ नये. मग आपण उरलेलं अन्न अनेक फेकून देतो. अनेक वेळा नोकरीमुळे आपण एक वेळ जेवण बनवून दोन वेळा तेच खातो. पण काही पदार्थ शिळं खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला धोका (Health hazard) होतो. 

पण तुम्हाला माहिती आहे का, शिळ्या चपात्या खाल्ल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. हो आज आपण जाणून घेणार आहोत शिळ्या चपात्या (Chapati) खाल्ल्यामुळे काय फायदे (Benefits) होतात ते. (stale bread amazing benefits of eating stale chapati in nm)

शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे (Benefits of eating stale chapatis)

पोटाचे दुखणे दूर होते (Abdominal pain)

शिळी चपातीमध्ये  फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे आजार दूर होतात. तसंच शिळी चपाती खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही. 

साखर राहते नियंत्रणात (Sugar stays under control)

दररोज दुधात मिसळून शिळी चपाती (Chapati) खाल्ल्यास तुमचा रक्तदाब आणिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिळ्या चपात्यांमध्ये काही बॅक्टेरिया असतात ज्यामुळे ग्लुकोजची पातळी कमी राहण्यास मदत होते. 

शरीराची ताकद वाढते  (Body strength increases)

दुधात मिसळून शिळी चपाती खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते आणि स्नायू मजबूत होतात. 

शरीराचे तापमान नियंत्रणात राहते (Body temperature remains under control)

उन्हाळ्यात शिळ्या चपात्या खूप फायदेशीर ठरतात. शिळ्या चपात्यांमध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असते. 

उष्माघात (heat stroke)धोका कमी

उन्हाळ्याच्या दिवसात शिळ्या चपात्या खाल्ल्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो. 

बीपी नियंत्रणात राहते (BP under control)

रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही शिळी चपाती फायदेशीर आहे. शिळ्या रोट्यामध्ये काही चांगले बॅक्टेरिया येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

वजन वाढण्यास मदत (weight gain)

दुधासोबत शिळ्या चपात्या खाल्ल्यास दुबळेपणा दूर होतो आणि वजन वाढण्यास मदत होते. 

शिळी भाकरी उर्जेने (energy) भरेल

शिळ्या चपात्या सेवन केल्याने भरपूर ऊर्जा मिळते. आळशी व्यक्तीने शिळी चपाती खाल्ल्यास फायदा होतो. 

जीम (Gym) जाणाऱ्यांसाठी फायद्याची 

तुम्ही जीमला जात असाल तर शिळ्या चपात्या नक्कीच खाव्यात. जीममध्ये स्नायू वाढवणाऱ्यांसाठी शिळ्या चपात्या खूप फायदेशीर आहे.

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)