ही भाजी तुम्हाला माहिती असेल, पण यात किती व्याधींना संपवण्याची क्षमता आहे...यादीच संपेना

या भाजीचे  काय काय फायदे आहेत, हे जाणून घेऊयात.  

Updated: Jul 2, 2021, 05:58 PM IST
ही भाजी तुम्हाला माहिती असेल, पण यात किती व्याधींना संपवण्याची क्षमता आहे...यादीच संपेना title=
मुंबई : दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून संपूर्ण जगावर कोरोनाचं (Corona) सावट आहे. कोरोनामुळे सर्वांनाच आरोग्याचं महत्वं समजलंय.  प्रत्येक जण आपले आरोग्य सांभाळण्याचं आणि फीट ठेवण्याचं प्रयत्न करतोय. आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी  तसेच फीट ठेवण्यासाठी विविध पदार्थांचं सेवन केलं जात आहे. (Spiny gourd or  kantola is very healhy vegetable know the benefits)
 
पावसाळ्यात काही विशिष्ट रानभाज्या बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी  एक म्हणजे कंटोळा. कंटोळाच्या (Spiny gourd) सेवनामुळे  रोगप्रतिकार मजबूत होतेच. सोबतच ताकदही वाढण्यास मदत होते. तसेच ही भाजी अनेक रोगांवर गुणकारक आहे. या भाजीचे नेमकं काय काय फायदे आहेत, हे जाणून घेऊयात.  
 
कंटोळामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटामिन ए, बी1, बी2, बी3, बी 5, बी6, बी9, बी12, व्हीटामीन सी, व्हीटीमीन डी 2 आणि 3,  व्हीटामीन एच, व्हीटामीन के,  कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक यासारखे पोषक आणि गुणकारी तत्व आहेत. म्हणजेच या भाजीच्या सेवनानंतर अनेक फायदे मिळतील. 
 
या रोगांवर गुणकारी कंटोळा
 
कंटोळा आपलं विविध प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवतं. इतकच नाही तर, यामुळे अनेक रोगांपासून सुटकाही होते. आयुर्वेदात कंटोळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे.  
 
डोकेदुखी, केसगळती, कानदुखी, खोकला, पोटदुखी, मूळव्याध, काविळ, डायबिटीज, लकवा, सर्पदंश, कॅन्सर, उच्च रक्तदाब, यासारख्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर ही भागी गुणकारी आहे. 
 
केवळ ही भाजीच गुणकारी आहे, असं नाहीये. कंटोळ्याची पानं, फूल, मूळांचा  वापर करुन औषध तयार केलं जातं.
 
संबंधित बातम्या :