घरापासून बाहेर पडताच कशी असते भारतीय महिलांची सेक्स लाईफ? सरकारी अहवालातून धक्कादायक खुलासा

भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. 

Updated: May 20, 2022, 10:35 AM IST
घरापासून बाहेर पडताच कशी असते भारतीय महिलांची सेक्स लाईफ? सरकारी अहवालातून धक्कादायक खुलासा title=

मुंबई : आजही भारतात लोकं सेक्सबद्दल बोलणं टाळतात. मात्र सेक्ससंदर्भात वाटणारी लाज आणि संकोच लोकांना धोकादायक आजारंही देऊ शकतात. नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्वेक्षणात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये प्रथम लैंगिक संबंध ठेवण्याचं वय, सेक्सुअल पार्टनर्सची संख्या आणि लैंगिक संबंधासाठी पैसे देण्याबाबत गोष्टींचा समावेश होता.

नॅशनल फॅमिली हेल्थच्या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर, लग्न झालेला जोडीदार किंवा घरात राहणाऱ्या जोडीदाराशिवाय इतरांशी शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

दरम्यान सरकारच्या या अहवालातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असल्याचं दिसून आलं. लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला.

घरातून बाहेर असल्यावर दिसून आलेला परिणाम

घरातून बाहेर पडल्यावर पुरुषांच्या तुलनेत महिलांचं लैगिंक संबंधांचं प्रमाण वाढलं आहे. जेव्हा महिला एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक वेळ घरारासून दूर असतात, तेव्हा सेक्सुअल पार्टनर्सची संक्या 1.7 च्या सरासरीच्या तुलनेत 2.3 पर्यंत वाढल्याचं दिसून आलं. तर पुरुषांसाठी ही सरासरी 2.1 राहते.

या सर्व्हेक्षणाअंतर्गत, 56 टक्के महिलांनी सांगितलं की, घरातून दूर गेल्यावर त्या लैंगिक संबंध ठेवतात. तर घरापासून दूर राहिल्यानंतर केवळ 32 टक्के पुरुष शारीरिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं.

भारतीयांचे किती सेक्शुअल पार्टनर्स?

या सर्व्हेमध्ये 15-49 वयोगटातील महिला आणि पुरुषांना गेल्या 12 महिन्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 1 टक्क्यांहून कमी महिलांनी (0.3 टक्के) आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे मान्य केलं. 

एका टक्क्यापेक्षा कमी महिला (0.5 टक्के) आणि 4 टक्के पुरुषांनी सांगितलं की, त्यांचे जोडीदार किंवा घरात राहणार्‍या व्यक्तीशिवाय त्यांचे इतर कोणाशीही शारीरिक संबंध आहेत.