Long COVID: कोरोनामुक्त झाल्यानंतर पुरुष लैंगिक आरोग्याची समस्यांनी त्रस्त, दिसली 'अशी' लक्षणं

कोरोनामधून बरं झाल्यानंतरही रुग्णांमध्ये त्याची काही लक्षणं कायम राहतात, ज्याला लाँग कोविड म्हणतात.

Updated: Aug 29, 2022, 06:29 AM IST
Long COVID: कोरोनामुक्त झाल्यानंतर पुरुष लैंगिक आरोग्याची समस्यांनी त्रस्त, दिसली 'अशी' लक्षणं title=

मुंबई : कोरोनाचा वेग आता कमी होताना दिसतोय. कोरोना व्हायरसबद्दल लोकांमध्ये असलेली भीती नक्कीच कमी झालीये. पण त्याचा उद्रेक अजून संपलेला नाही. सध्या तरी कोरोनाच्या नवीन रुग्णांचा वेग थांबण्याचे नाव घेत नाहीये. ही चिंतेची बाब आहे की, कोरोनामधून बरं झाल्यानंतरही रुग्णांमध्ये त्याची काही लक्षणं कायम राहतात, ज्याला लाँग कोविड म्हणतात.

लाँग कोविड काय आहे?

लाँग कोविड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही लक्षणं कायम राहतात. दीर्घ कोविड लक्षणं आठवडे किंवा महिने टिकू शकतात. जर आपण लाँग कोविडच्या लक्षणांबद्दल बोललो तर त्यात खोकला, ताप, थकवा आणि अशक्तपणा इत्यादी लक्षणं दिसून येतात.

आता एका नवीन अभ्यासात असं आढळून आलंय की, बरं झालेल्या रुग्णांमध्ये लैंगिक आरोग्याशी संबंधित लक्षणं देखील दिसू शकतात. कोरोनाचा हृदय आणि मेंदूसह आपल्या शरीराच्या विविध भागांवर वाईट परिणाम होतो. आता संशोधकांच्या नव्या अभ्यासानुसार, याचा लैंगिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. अलीकडील अभ्यासात, तज्ज्ञांनी तीन लक्षणं ओळखली आहेत.

कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम

ब्रिटीश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात 500,000 हून अधिक लोकांचा समावेश आहे जे कोरोनाने ग्रस्त आहेत. असं आढळून आलंय, की बहुतेक लोक कमी कामेच्छा (Low libido) आणि Ejaculating होण्यास त्रास होत असल्याची तक्रार करतात. याव्यतिरिक्त, संशोधकांना असंही आढळून आलंय की, केस गळणे ही देखील लैंगिक आरोग्य कमी झाल्यामुळे संबंधित समस्या आहे.

सेक्स ड्राइव कमी होणं

जर कोरोनानंतर तुमची लैंगिक क्रियांमध्ये इच्छा कमी झाली असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याआधी मानसिक आरोग्याची काळजी घेणं, पुरेशी झोप घेणं, व्यायाम करणं आणि सकस आहार घेणं यांसारख्या सवयींचं पालन केलं गेलं पाहिजे.