हायपोथायरॉईडीझमवर वेळीच मात कशी कराल ?

दिवसेंदिवस अनेक आजारांचा धोका अधिक गंभीर आहे. अनेक आजारांकडे  पुरेसे लक्ष न दिल्याने त्याचा धोका अधिक बळावतो. अशा आजारांपैकी एक म्हणजे 'हायपोथायरॉईडीझम'. 

Dipali Nevarekar health.india.com | Updated: Mar 12, 2018, 08:28 PM IST
हायपोथायरॉईडीझमवर वेळीच मात कशी कराल ?   title=
thehealthsite.com

मुंबई : दिवसेंदिवस अनेक आजारांचा धोका अधिक गंभीर आहे. अनेक आजारांकडे  पुरेसे लक्ष न दिल्याने त्याचा धोका अधिक बळावतो. अशा आजारांपैकी एक म्हणजे 'हायपोथायरॉईडीझम'. 

भारतामध्ये हायपोथायरॉईडीझम ही समस्या सामान्यपणे आढळत असली तरीही अनेक रुग्णांना वेळीच त्याचा धोका समजत नाही. त्यामुळे याचे निदानदेखील होत नाही. म्हणूनच या समस्येवर मात करण्यासाठी डॉ. अरूण देहिया यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सल्ल्याकडे नक्की लक्ष द्या. 

हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय ? 

ज्या वेळेस शरीरात आवश्यकतेपेक्षा थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती कमी प्रमाणात होते त्या समस्येला वैद्यकीय भाषेत 'हायपोथायरॉईडिझम' असे म्हणतात. 

मेंदू, हृद्य, स्नायू यांचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी थायरॉईड हार्मोन्स महत्त्वाचे कार्य करत असते. हे हार्मोन रक्तामध्ये शोषले जाते त्यानंतर त्याचा शरीरातील इतर अवयवांना पुरवठा केला जातो. 

हायपोथायरॉईडिझमच्या समस्येमध्ये मेटॅबॉलिझम (चयापचन) प्रकिया मंदावते. परिणामी इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होतो. 

हायपोथायरॉईडिझमच्या रुग्णांमध्ये आढळणारी लक्षण ? 

हायपोथायरॉईडग्रस्त रुग्ण सतत निरूत्साही, थकलेला असतो. इतरांपेक्षा त्याला वातावरण अधिक थंड वाटते. 

अनेक रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता, त्वचा शुष्क होणं, हृद्याच्या धडधडीची गती मंदावणं, वजन वाढणं अशा समस्या वाढतात. 

अनेकांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या बळावते, हृद्यविकाराचा धोकादेखील बळावतो. 

लहान मुलांमध्ये हायपोथायरॉईडिझम वाढत असल्यास त्यांच्या शारिरीक आणि बौद्धिक वाढीमध्ये दोष आढळू शकतात.  

सार्‍यांमध्ये  सारखीच लक्षण आढळतात का ? 

हायपोथायरॉईडिझमच्या रुग्णांमध्ये ही लक्षणं एक किंवा त्याहून अधिक जास्त लक्षणं दिसू शकतात. हे व्यक्तीपरत्वे आणि समस्येच्या गंभीरतेवर अवलंबून असते. 

सौम्य प्रमाणात समस्या असल्यास लक्षणं आढळत नाहीत. तर काहींमध्ये भविष्यात हा धोका अधिक बळावण्याची शक्यता असते. 

ओव्हर्ट हायपोथायरॉईडिझमच्या रुग्णांना वेळीच निदान आणि औषधोपचाराची गरज असते. 

हायपोथायरॉईडिझमची समस्या किती सामान्य आहे ? 

समान्यपणे समाजात 4% रुग्ण हे हायपोथायरॉईडिझमचे असतात. सौम्य प्रकारातील हायपोथायरॉईडिझम हा 10% रुग्णात असतो.  पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा धोका अधिक असतो. करोडो भारतीय हायपोथायरॉईडिझमच्या जाळ्यात आहेत. 

हायपोथायरॉईडिझमचा धोका कोणाला असतो ? 

वय, लिंग, आर्थिक स्तर असा कोणताच भेदभाव नसतो. प्रामुख्याने पूर्वी थायरॉईड डिसफंक्शन असणार्‍यांमध्ये हा धोका अधिक बळावतो. टाईप 1 डायबिटीस, अ‍ॅनिमिया अशा त्रासातून हायपोथायरॉईडिझमचा त्रास बळावू शकतो. 

हायपोथायरॉईडिझमचे निदान कसे होते ? 

हायपोथायरॉईडिझमचे निदान करण्यासाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक आहे. डॉक्टर रुग्णांच्या संबंधित लक्षणांवरून हायपोथायरॉईडिझमचे निदान करण्यासाठी पॅथॅलोजिकल टेस्ट सुचवतात. त्यावरूनच या आजाराचे निदान केले जाऊ शकते.  

हायपोथायरॉईडिझमवर उपचार कसे केले जातात ?  

हायपोथायरॉडिझमवर उपचार करण्यासाठी L-thyroxine  या हार्मोन्सची मदत घेतली जाते. काही औषधगोळ्यांमध्ये L-thyroxine या हार्मोन्सचा समावेश केला जातो. हे हार्मोन शरीरात स्त्रवणार्‍या हार्मोनप्रमाणे काम करते.  

L-thyroxine चा डोस हा प्रत्येक रूग्णासाठी वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे औषधोपचार सुरू केल्यानंतरही डॉक्टर्स  त्याचा परिणाम पाहून पुढील उपचार पद्धती ठरवतात. त्यामध्ये बदल होऊ शकतात.

गरोदरपणाच्या काळात या उपचारांमध्ये बदल केले जाऊ शकतात.त्यामुळे गरोदर स्त्रीयांनी त्या गरोदर असल्याचे कळताच डॉक्टरांना संबंधित माहिती देणं आवश्यक आहे. 

हायपोथायरॉईडिझमवर मात करता येऊ शकते का ? 

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास हायपोथायरॉईडिझमपासून सुटका होऊ शकते. मात्र औषध गोळ्या या तज्ञांच्या सल्ल्यानेच घेणं आवश्यक आहे. 

English मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा Let’s Be #ThyroidAlert

Disclaimer:

This article is for public awareness only. For any medical queries please consult your physician.
The mere appearance of the article on this site does not constitute an endorsement by GlaxoSmithKline Pharmaceuticals Ltd (GSK) or its affiliates of such site. The article is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
GSK hereby disclaims any and all liability to any party for any direct, indirect, implied, punitive, special, incidental or other consequential damages arising directly or indirectly from any use of this article, which is provided as is, and without warranties.

Public health initiative by GSK on Thyroid Awareness Month
Zinc no: IN/LTX/0007/18; Date of preparation – January 2018