मुंबई : लग्नाचं पवित्र नातं हे सात जन्माचं अतूट बंधन मानलं जातं, पण कधी कधी पती-पत्नीच्या नात्यातील छोटे-छोटे गैरसमज हे नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग तुमचं लग्न अरेंज मॅरेज असू देत किंवा लव मॅरेज सर्वांसाठीच ही छोटी कारणं नातं तुटण्याच्या वळणावर घेऊन जातात. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्यातुम्हाला नातं टिकवण्यासाठी मदत करतात.
वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जोडीदाराची विचारसरणी आणि वागणूक जाणून घेण्याचा प्रयत्न करता, सामान्यतः लग्नात दोन ते तीन महिन्यांचे अंतर असते, जे तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेले असते, तर चला जाणून घेऊया, लग्नाआधीच्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या भावी जोडीदाराबद्दल माहिती असायला हव्या.
कोणतंही नातं घट्ट होण्यासाठी एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे असते, हीच गोष्ट लग्नासारख्या टिकवून ठेवते, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर केला नाही, तर तुम्ही त्याच्यावर कधीच प्रेम करू शकणार नाही. लग्नासारखे पवित्र बंधन घट्ट करण्यासाठी नात्यात प्रेम आणि आदर असणे आवश्यक आहे.
जेव्हा जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा अनेक गोष्टी जाणून घेण्याची तळमळ असते, तर अशा वेळी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला गोंधळून टाकतात. पण जेव्हा जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा नक्की याचा विचारा करा किंवा जोडीदाराला गृहित न ठेवता विचारा की त्याला लग्न करायचे आहे का? भविष्यात जर तुमचा जोडीदार जबरदस्ती तुमच्या लग्न करणार असेल, तर लक्षात घ्या की, हे नातं फारकाळ टिकणार नाही.
तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी, तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक यांना जाणून घ्या, तसेच त्यांच्या पूर्वीच्या नातेसंबंधांबद्दल विचारा, इतर लोकांना काय आवडते, लोकांनी घरी ये-जा केलं तर त्याला कसं वाटेल? जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल सगळ्या गोष्टी ठाऊक असतील, तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीही वाद होणार नाहीत.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला लग्नानंतर विचारू शकता, तुम्हाला कुटुंबासोबत राहायला आवडते का, कारण अनेकदा अनेकांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायला आवडते. तर अनेकांना वेगळं राहायला आवडते. त्यामुळे या गोष्टी क्लिअर करा.