आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला डेट करतो तेव्हा आपल्याकडून नकळत काही चुका होतात. त्या चुका कोणत्या आहेत, त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून काय केले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Relationship tips Do you make these dating mistakes Secret tips to avoid mistakes)
1. वेळ द्या -
प्रत्येक गोष्टीला वेळ देणे जसं गरजेचे आहे. तसेच नात्याच्या बाबतीतही आहे. एखादं नातं फुलवायला वेळ लागतो. पण एकदा का ते फुललं ते कायम टिकतं. जेव्हा तुम्ही डेटिंग करता तेव्हा समोरील व्यक्तीला वेळ देणे खुप महत्त्वाचे आहे. डेटिंग करत असताना दोन्ही व्यक्ती एकमेकांना जोडीदाराच्या नजरेने पाहत असतात. त्यामुळे त्याच्या विचारांना न दुखवता त्या व्यक्तीला मान दिला पाहिजे आणि आपले विचार देखील समोर मांडले पाहिजे. समोरचा व्यक्ती तुमच्या वागण्याचं परिक्षण देखील करत असते म्हणूनच असं कोणतेही गैरवर्तन करु नका.
2. ओव्हरशेअरिंग करणे टाळा -
डेटिंग करताना आपण पहिल्यांदा समोरील व्यक्तीला भेटतो. तेव्हा भावनेच्या भरात अतिरिक्त खाजगी माहिती देणे बरोबर नाही. कुठली गोष्ट कुठे बोलली पहिजे, किती बोलली पाहिजे हे आपल्यालाच समजलं पाहिजे. तुम्ही चुकीची किंवा जे बोलायचं नाही असं बोलून बसलात तर अशा वागण्याने कदाचित ती व्यक्ती तुयमच्यापासून दूर जाऊ शकेल.
3. योग्यता सिद्ध करण्याची गरज नाही -
तुम्ही त्या व्यक्तीसाठी योग्य आहात हे तुम्हाला वारंवार सिद्ध करायची गरज नाही. कोणतंही नातं तयार होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी त्या व्यक्तींमधील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरतो. समजूतदार पण असेल तरच तुमचं नातं हेल्थी राहू शकतं. तुम्ही इतरांसोबत स्वत:ची तुलना करण्यात वेळ वाया घालवू नका. नेहमी लक्षात ठेवा की डेटिंग करताना समोरील व्यक्तीला प्रभावित करण्यापेक्षा त्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी तसे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
आणखी वाचा... What Girls Notice In Boys: मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात; आताच जाणून घ्या...
4. निवडकर्ते होऊ नका -
डेट करताना समोरील व्यक्तीची निवड करण्याऐवजी मी त्या व्यक्तीसाठी योग्य आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचारा. एखाद्याची निवड करणे खुप सोपं आहे. पण आपण या त्या व्यक्तीसाठी तुम्ही खरंच योग्य आहात का याचं उत्तर शोधणे थोडं कठीण आहे.
5. काल्पनिक जगात नाही वास्तवात जगा -
डेट करताना समोरील व्यक्तीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला याचा अर्थ असा होत नाही की ती तुमच्यासोबत पुर्ण आयुष्य घालवायला तयार आहे. त्यावेळेस काल्पनिक विचारात न जगता वास्तवात जगा.
6. थेट संवाद -
कुणाला डेट करताना तुम्ही समोरच्याने तुमच्या मनातील सर्व काही ओळखावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची ही अपेक्षा चुकीची आहे. तुम्ही तुमच्या लिमिटेशन्स आणि तुमच्या इच्छा, भविष्यातील स्वप्न आधीच बोलून स्पष्ट करणं गरजेचं आहे. थेट बोलणं कधीही चांगलं असतं
आणखी वाचा... Patch Up Tips: तुम्हालाही पॅचअप करायचंय? 'या' टिप्स ठरतील फायद्याच्या
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)