Relationship Advice: बायको रागवली आहे? या ट्रिप्स वापरा आणि बायकोचा राग झटक्यात दुर करा

जर तुमचेही तुमच्या बायकोसोबत भांडण झाले असेल आणि ती तुमच्यावर रागावली असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही अप्रतिम टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोचा राग चुटकीसरशी घालवू शकता.

Updated: Aug 9, 2022, 10:50 PM IST
Relationship Advice: बायको रागवली आहे? या ट्रिप्स वापरा आणि बायकोचा राग झटक्यात दुर करा title=

मुंबई : पती-पत्नीचे नाते हे खूप सुंदर नाते किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं नातं असो, हे नातं फारच सुंदर नातं आहे. हे दोघेही एकमेकांचे सुख-दु:ख एकत्र वाटून घेतात, त्यामुळे नात्यामध्ये समंजसपणा आणि गोडवा कायम राहातो. परंतु प्रेम म्हटलं की, भांडणं देखील येणारच. प्रेमासोबतच भांडण आणि राग हा जीवनाचा एक भाग आहे आणि कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. परंतु या भांडणाचा परिणाम कधीही नात्यावर पडू देऊ नका.

जर तुमचेही तुमच्या बायकोसोबत भांडण झाले असेल आणि ती तुमच्यावर रागावली असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही अप्रतिम टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या बायकोचा राग चुटकीसरशी घालवू शकता.

जर तुमची पत्नी तुमच्यावर खूप रागावली असेल तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे तिची माफी मागणे. हा पर्याय खरंच काम करतो. कारण बायको तुमच्यावर नवरा किंवा लाईफपार्टनर म्हणून प्रेम करत असते, त्यामुळे तुम्ही तिची माफी मागितली, तर ती लगेचच तुम्हाला माफ करेल आणि हा पर्याय बऱ्याच विविहीत पुरुषांना माहित देखील आहे.

जर फक्त सॉरी म्हटल्याने बायको माफ करत नसेल, तर तिला फुलं किंवा काहीतरी गिफ्ट घेऊन जा, ती तुम्हाला लगेच माफ करेल.

ही गोष्ट कधीही करु नका

जर तुमची बायको तुमच्यावर रागावली असेल आणि तुम्ही तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर नक्कीच लक्षात ठेवा की तुम्ही तिच्यासमोर तुमचा राग नियंत्रित ठेवा. रागावलेल्या बायकोला आणखी रागवू नका किंवा तिचा राग वाढेल किंवा तिला वाईट वाटेल अशी कोणतीही चुक करु नका. कारण रागाच्या भरात तुमच्या तोंडातून असे काही निघाले नंतर तुम्हाला त्याचा पश्चातापही होईल.

या काळात वाद मिटवा

नेहमी लक्षात ठेवा की, त्या दिवशीचं भांडण त्याच दिवशी संपवा, उगाच रुसवे फुगवे वाढू देऊ नका. तसेच प्रयत्न करा की रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या दोघांचा राग शांत व्हावा आणि भांडण संपावं. ही एक अतिशय महत्वाची रिलेशनशिप टीप आहे की जोडप्याने रात्र आधी भांडण संपवावं आणि मग झोपावं. कारण दोघेही रात्रभर याचाच विचार करत राहतील आणि दुसरा दिवस देखील यामुळे खराब होईल, तसेच याचा कामावर परिणाम होईल आणि मिसअंडस्टँडिंग वाढत राहिल.

अशा प्रकारे बायकोचा मूड ठीक करा

एवढं करूनही जर तुमची बायको सहमत नसेल, तर सकाळी बायकोसोबत उठण्याचा प्रयत्न करा, तिच्यासोबत चहा आणि नाष्टा, तसेच इतर घरकाम करण्यात तिला मदत करा किंवा तिला बाहेर घेऊन जा, चित्रपट दाखवा आणि तिला खायला द्या.

जर तुमची पत्नी तुमच्यावर रागावली असेल तर असे विचित्र हावभाव करा आणि तिला हसवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तिला आतून आनंद होईल आणि तिचा राग थोडा कमी होईल.