चहासोबत 'या' पदार्थाचं सेवन आरोग्याला धोकादायक !

योग्यप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.

Updated: Jun 2, 2018, 08:22 AM IST
चहासोबत 'या' पदार्थाचं सेवन आरोग्याला धोकादायक ! title=

मुंबई : योग्यप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. मात्र दिवसाची सुरूवात चहाच्या सेवनाने करू नये. असा सल्ला तुम्हांला अनेकदा मिळाला असेल. दिवसाची प्रसन्न सुरूवात करण्यासाठी किंवा सुस्तपणा हटवण्यासाठी अनेकदा चहा पिण्याची सवय लोकांना असते. मात्र चहासोबत तुम्ही काय खाता? यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

चहासोबत सिगारेट ओढण्याची सवय तर नाही ना  ?  

ताणतणाव हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. अशातच अनेकांना सिगारेट झुरका मारत चहा पिण्याची सवय असते. मात्र हीच सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

आरोग्यावर गंभीर परिणाम 

तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने गळा आणि पोट या दोन्ही अवयवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. एका संधोधनानुसार, स्मोकर्स म्हणजेच धुम्रपान करणार्‍या व्यक्तींनी चहापासून दूर रहावे. सिगारेटसोबत गरम चहा पिण्याची तुम्हांला सवय असेल तर यामुळे अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते. सोबतच या घातक सवयीमुळे  अन्ननलिकेचा कॅन्सर बळावण्याची शक्यता पाचपटीने वाढते. #WorldNoTobaccoDay - टोबॅकोचं व्यसन दूर करायला मदत करतील आयुर्वेदातील हे उपाय

कॅन्सरचा मोठा धोका 

संशोधनानुसार धुम्रपान आणि मद्यपानाची सवय अन्ननलिकेच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. यासोबतच तुम्ही चहादेखील पिण्याची सवय ठेवत असल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. सिगारेट सोबत केवळ चहाच नव्हे तर इतर गरम पदार्थ किंवा डिंक्सचं सेवन करणंदेखील त्रासदायक आहे.