Sex partner : एका ठराविक काळानंतर आरोग्यविषयक सर्व्हे केले जातात. असंच भारताच्या आरोग्य मंत्रालयाने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ( National Family Health Survey ) केला. दरम्यान या सर्व्हेक्षणातून अनेक धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. या सर्व्हेमध्ये राज्यांतील अनेक लोकांना सेक्स या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. मुळात आपल्या समाजात अजूनही सेक्सबाबत खुलेपणाने बोललं जात नाही. अशातच या सर्व्हेमधून पुरुष आणि महिलांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ( National Family Health Survey ) मधून देशातील विविध राज्यात राहणाऱ्या व्यक्तींच्या सेक्स पार्टनरविषयी माहिती मिळाली आहे. यामधून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पाटर्नस जास्त होते. याचाच अर्थ महिलांनी एकापेक्षा अधिक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे हा भारतातील 11 राज्यांमध्ये करण्यात आला. ज्यामध्ये सुमारे 1.1 लाख महिला आणि 1 लाख पुरुषांनी सहभाह नोंदवला होता. या सर्वेक्षणात असं समोर आलंय की, 4 टक्के पुरुषांनी अशा महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत ज्यांच्यासोबत ते राहत नव्हते. इतकंच नव्हे तर या महिलांना ते ओळखतही नव्हते.
याशिवाय महिलांची या बाबतीत संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. महिलांच्या बाबतीत ही संख्या पाहिली तर ती 0.5 टक्के होती. मात्र राजस्थानचं चित्र पाहिलं तर ते फारच वेगळं दिसून आलं.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार महिलांचे सेक्स पार्टनर पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं. ज्या राज्यांमधून ही आकडेवारी समोर आली आहे त्यात हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, आसाम, लडाख, तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश होता. या राज्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील महिलांना एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर्स आहे. याची संख्या पाहिली तर ती सरासरी 3.1 आहे. तर पुरुषांची संख्या 1.8 आहे.
15-49 वयोगटातील महिला आणि पुरुषांना त्यांच्या एका वर्षातील लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न कऱण्यात आले होते. सर्व्हेमध्ये असं दिसून आलंय की, महिला आणि पुरुष सरासरी सात दिवसांच्या अंतराने शारीरिक संबंध ठेवतात. यावेळी असंही दिसून आलंय की, जर स्त्रिया एका महिन्यापेक्षा जास्त काळ बाहेर राहिल्या असतील तर त्यांच्या सेक्शुअल पार्टनर्सची संख्या सरासरी 1.7 च्या तुलनेत 2.3 टक्क्यांनी वाढली. यावेळी 56 टक्के मुलींनी कबूल केलं की, त्या घराबाहेर असल्यावर संबंध ठेवतात.