First Chikungunya Vaccine : मोठा दिलासा! चिकनगुनियावरील लस इतर संसर्गजन्य आजारांवरही प्रभावी

First Chikungunya Vaccine : राष्ट्रीय कीटक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजारांवर दोन वर्षांत नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूही कमी झाल्याचे दिसून आले आहे

Updated: Jun 14, 2023, 03:41 PM IST
First Chikungunya Vaccine : मोठा दिलासा! चिकनगुनियावरील लस इतर संसर्गजन्य आजारांवरही प्रभावी   title=
First Chikungunya Vaccine

First Chikungunya Vaccine News in Marathi : डासांच्या चाव्याद्वारे पसरणाऱ्या आजारांना डासांमुळे होणारे आजार असे म्हणतात. डास झिका विषाणू, वेस्ट नाईल विषाणू, चिकनगुनिया विषाणु, डेंग्यू आणि मलेरिया मानवांमध्ये प्रसारित करु शकतात. इतर डासांमुळे होणाऱ्या रोगांवर लक्ष केंद्रित केले जाते जे दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करतात. दरम्यान चिकनगुनिया हा आजारा (Chikungunya Vaccine) डासांमुळे होणाऱ्या धोकादायक आजारांपैकी एक आहे. यामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. मात्र आता याच आजारावर आता लवकरच लस येण्याची शक्यता आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्या असून या चाचणीमध्ये ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या कमी

दरम्यान गेल्या दोन वर्षांत चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 2021 मध्ये राज्यात चिकनगुनियाचे 2 हजार 526 रुग्ण आढळले होते. तर 2022 मध्ये हीच संख्या 1 हजार 87 वर आली. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या 50 टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. 2023 अखेरपर्यंत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 200 चिकुनगुनिया रुग्णांची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान प्रतिबंधात्मक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष 'द लॅन्सेट जर्नल' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. फ्रेंच बायोटेक कंपनी 'व्हॅल्नेव्हा'ने 'VLA-1553' तयार केले असून ते चिकनगुनियानंतर मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या इतर आजारांशी कसे लढते? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जिथे चिकनगुनिया हा एंडोमिक टप्प्यामध्ये पोहलेला नाही तिथे या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या नसल्याने त्याबाबत आताच निष्कर्ष काढणे शक्य नाही, असे संशोधकांकडून सांगण्यात आले. सध्या आफ्रिकेतील काही भाग, आशिया आणि अमेरिकेतील काही भागांमध्ये चिकनगुनिया रोग स्थानिक असल्याचे आढळून आले आहे. या विषाणूजन्य अडथळा असलेल्या डासाने चावा घेतल्यानंतर साधारणतः चार ते आठ दिवसांत रुग्णाला ताप येऊ लागतो.

चिकनगुनियाची लक्षणे

डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, सांधेदुखी यांसारखी लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात. अनेक रुग्णांमध्ये, चक्कर येणे काही आठवड्यापर्यंत टिकू शकते. चिकनगुनियानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते, परंतु ज्येष्ठ नागरिक आणि नवजात बालकांसाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते. व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी सध्या बाजारात कोणतीही मान्यताप्राप्त लस उपलब्ध नाही आणि त्याविरुद्ध अँटीव्हायरल उपचार पद्धतीही उपलब्ध नाहीत.