दिल्ली : Omicron व्हेरिएंटची प्रकरणं भारतात वाढताना दिसतायत. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी केला आहे. डॉ.कोएत्झी यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रथम ओळखला होता. त्यांनी असंही सांगितलं की, सध्याच्या लसींमुळे संसर्गावर नक्कीच नियंत्रण येईल, परंतु जे लोक लस घेत नाहीत त्यांना याचा 100 टक्के धोका आहे.
डॉ. कोएत्झी यांनी सांगितलं की, 'ओमायक्रॉन, लसीकरण झालेल्या किंवा पूर्वी संसर्ग झालेल्या लोकांमध्ये कमी पसरेल. तर जे लस घेत नाहीत ते त्यांना याचा धोका अधिक आहे.'
ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो.
ओमायक्रॉन व्हेरिएंट आता अंतिम टप्प्यात आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र डॉ. कोएत्झी हे या तज्ज्ञांच्या मताशी सहमत नाहीत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत भारतात ओमायक्रॉन संसर्गाची एकूण 400 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 115 रुग्ण बरे झाले आहेत. डॉ. कोएत्झी म्हणाले की, कोणताही व्हायरस जो नियंत्रणाबाहेर जातो तो माणसांसाठी धोकादायकच असतो.
दरम्यान देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशातील एकूण 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. तर आता संपूर्ण देशभरात संपूर्ण देशभरात ओमायक्रॉमन रूग्णांची संख्या 422 वर जाऊन पोहोचली आहे.
422 पैकी 108 ओमायक्रॉनची प्रकरणं ही एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर गुजरात आणि तेलंगणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत.