मुंबई : राज्यासह देशात कोरोनासह ओमायक्रॉनचा धोका वाढतोय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या या ओमायक्रॉनमुळे सर्वसामांन्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. आतापर्यंत कोरोनाचे आलेल्या नवनव्या व्हेरिएंटची लक्षणं भिन्न आहेत. us centers for disease control and prevention नुसार, ओमायक्रॉनचे 4 सामन्य लक्षणं आहेत. यामध्ये खोकला, थकवा, कफ, नाक गळणं ही ओमायक्रॉनची लक्षण आहेत. मात्र एम्सने (All India Institute of Medical Sciences) ओमायक्रॉन विषाणूची 5 लक्षणं सांगितली आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन एम्सने केलं आहे. जर तुम्हाला एम्सने सांगितलेली लक्षणं जाणवत असतील, तर तुम्हाला ओमायक्रॉनचा धोका जास्त असू शकतो. (omicron variant symptoms aiims has told 5 dangerous symptoms of omicron see what is a 5 symptoms)
ओमायक्रॉनचे 5 लक्षणं
श्वास घेण्यास त्रास
ऑक्सीजन पातळीत घट
छातीत दुखणं किंवा त्रास
मानसिक गोंधळ
लक्षणांचा 3-4 दिवसांपेक्षा अधिक त्रास
अचानक त्वचा, ओठ किंवा नखांचं रंग बदलत असेल, तर सतर्क राहा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना टेस्ट कधी करायची?
तज्ज्ञांनुसार, कोणत्याही व्हायरल आजाराचा संसर्ग झाला असेल, तर पुढील 5 दिवसात किंवा लक्षणं आढळून आल्यास त्वरित टेस्ट करायला हवी.
तसेच लक्षणं असूनही टेस्ट निगेटिव्ह आल्यास तुम्हाला काहीच झालं नाही, असा समज करुन घेऊ नका. घशात खवखव, डोकेदुखी, साधारण ताप आणि अंगदुखी ही देखील कोव्हिडची लक्षणं आहेत.
टेस्ट केल्यानंतर ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील, तर काही दिवसांनी पुन्हा कोरोना टेस्ट करुन घ्यावी.
देशात एकूण ओमायक्रॉनचे रुग्ण किती?
देशात ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 3 हजारच्या पार गेला आहे. मात्र यापैकी 1 हजार 199 जणांनी यावर मात केली आहे. देशात सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात सर्वाधिक 876 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत.