मुंबई : युरोपातील देशांमध्ये ओमायक्रॉनने थैमान घातलं आहे. आता हळूहळू भारत देशातही याचा धोका वाढू लागला आहे. देशातील अनेक भागांमध्ये ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे देशामध्ये आता ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या 500 पार गेली आहे.
देशात ओमायक्रॉनचा धोका वाढताना दिसतोय. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 500वर जाऊन पोहोचलीये. महाराष्ट्र, दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. धोका असणाऱ्या 10 राज्यांमध्ये केंद्रीय टीम दौरा करणार आहे.
महाराष्ट्र राज्यात रविवारी ओमायक्रॉनचे सर्वाधिक 21 रुग्ण आढळलेत. तर राज्यात कोरोनाच्या 1 हजार 648 रुग्णांची भर पडली. यापैकी एकट्या मुंबईत तब्बल 922 रुग्ण वाढलेत. मुंबईत गेल्या 12 दिवसांत रुग्णसंख्या झाली चौपट झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात आता ओमायक्रॉनचे एकूण 141 रुग्ण असल्याची नोंद आहे.
दुसरीकडे ओमायक्रॉन व्हेरिएंटची केरळमध्ये 19, तेलंगणात तीन, आंध्र प्रदेशात दोन, हिमाचल प्रदेशात एक, ओडिशात चार, चंदीगडमध्ये दोन आणि मध्य प्रदेशात नऊ प्रकरणं नोंदवली आहेत.
महाराष्ट्रानंतर ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 79 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये 23 रूग्ण बरे होऊन परतले आहेत.