ओट्समुळे चांगले पचन, वजन कमी करण्यासाठी, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहार तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ तुम्हाला ते नाश्त्यात खाण्याचा सल्ला देतात. हे पोटासाठी चांगला आहार समजला जातो. आणि ते खाणे देखील फायदेशीर आहे. पण त्याचे काही दुष्परिणामही शरीरावर होतात, ते समजून घ्या.
अभ्यासानुसार, बहुतेक ओट्स 'क्लोरमेक्वॅट' या विषारी कृषी रसायनाच्या संपर्कात येतात. 2017 आणि 2023 दरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये, 80 टक्क्यांहून अधिक अमेरिकन वापरत असलेल्या 'क्लोरमाक्वाट' दिसले. याशिवाय मे 2023 मध्ये खरेदी केलेल्या 92 टक्के ओट-बेस्ट उत्पादनांमध्ये हे हानिकारक रसायन आढळले. ज्यामध्ये काही मोठ्या ब्रँडचाही समावेश आहे. अभ्यासात क्लोरमेकॅटचा रिप्रोडक्शन आणि मेंदूच्या विकासात विषारीपणाशी संबंध असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढत असूनही हा पदार्थ खाणं शरीरासाठी घातक ठरत आहे.
आहारतज्ज्ञ म्हणतात की, ओट्स वजन कमी करण्यास मदत करतात. पण जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. दररोज खूप ओट्स खाल्ल्याने वजन वाढू शकते. ओट्स बनवताना, बरेच लोक क्रीम, सुकामेवा, चॉकलेट चिप्स आणि साखर तृणधान्यांपर्यंतचे टॉपिंग घालतात. जे साखर आणि मीठ वरुन घालणे घातक ठरु शकते.
जरी ओट्स नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री असले तरीही त्यावर गहू, बार्ली किंवा राई सारखीच प्रक्रिया करतात. ज्यामुळे आपल्याला सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असल्यास आणि आपण नियमितपणे ओट्स खाल्ल्यास ते देखील होऊ शकते. म्हणूनच ग्लूटेन-मुक्त ओट्स निवडणे महत्वाचे आहे.
ओट्समुळे काही प्रमाणात जठरासंबंधी सूज देखील होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ओट्स खाण्यास सुरुवात कराल तेव्हा त्याचे प्रमाण सुरुवातीपासून कमी खा. मग हळूहळू सेवन वाढवा. ओट्समध्ये फायटिक ॲसिड भरपूर असते. जे कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांचे शोषण रोखते. ओट्स भिजवून किंवा आंबवल्याने त्यांच्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)