आता मधुमेहीग्रस्त रूग्णही खाऊ शकणार गोडधोड, पण...

तुम्ही तुमच्या आहारात मिठाईचा समावेश करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग प्लॅन बनवावा लागेल. 

Updated: Jan 31, 2022, 09:36 AM IST
आता मधुमेहीग्रस्त रूग्णही खाऊ शकणार गोडधोड, पण... title=

मुंबई : डायबेटीजग्रस्त रूग्णांना मिठाई खाण्यास मनाई असते. परंतु आता डायबेटीजचे रुग्णंही मिठाई खाऊ शकणार आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण आता मधुमेहाच्या रुग्णाला गोडं खावेसं वाटत असेल तर मन मारण्याची अजिबात गरज नाहीये. एक चांगली स्ट्रॅटेजी प्लॅन करून डायबेटीग्रस्त रूग्ण मिठाई खाऊ शकणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुम्ही तुमच्या आहारात मिठाईचा समावेश करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग प्लॅन बनवावा लागेल. मग तुम्ही गोड खाऊ शकता. मात्र एक लक्षात ठेवा या गोडाचं प्रमाण जास्त नसावं.

मिठाईच्या सेवनाने तुमच्या शरीरातील ब्लड शुगरवर परिणाम होऊ शकतो. भरपूर साखरेचं सेवन केल्याने डायबेटीज होण्याचा धोका वाढू शकतो, परंतु योग्य आहारासह ते कमी प्रमाणात सेवन केलं जाऊ शकतं.

मधुमेहाचे रूग्ण गाजराचा हलवा खाऊ शकतात

हिवाळ्यात गाजराच्या हलवा प्रत्येकाला खावासा वाटतो. अशा परिस्थितीत गाजराच्या हलव्याचा स्वाद मधुमेही रूग्ण घेऊ शकत नाहीत. अशावेळी गाजर टोन्ड दुधात मऊ होईपर्यंत उकळा. आणि त्यानंतर त्यात गूळ घालून शिजवा. अशा हलवा तुम्ही काहीशा प्रमाणात खाऊ शकतात.

घरीच बनवा कस्टर्ड

याशिवाय मधुमेहाचे रुग्ण घरी बनवलेले कस्टर्ड खाऊ शकतात. त्यामध्ये केळी घाला, पण साखर अजिबात घालू नका. केळी हा मधुमेहींसाठी योग्य पर्याय आहे. केळ्यांमध्ये साखर आणि कार्ब असतात. मधुमेही रुग्ण केळी खाऊ शकतात, परंतु त्यांनी ते फार कमी प्रमाणात खावे.

ग्रीक योगर्ट खा

मधुमेही रूग्ण कमी-साखर आणि कमी गोड ग्रीक योग्य खाऊ शकतात. रुग्णांसाठी हे एक चांगला गोड पदार्थ असू शकतो. ग्रीक दह्यामध्ये सामान्य दह्यापेक्षा जास्त प्रथिनं आणि कमी कार्ब तसंच साखरही की असते.