मुंबई : आजकाल अनेक लोकांची जीवनशैली चुकीची असते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल शरीरात वाढू लागतं. सध्या प्रत्येकाने त्यांच्या लाईफस्टाईलवर लक्ष द्यावं लागतं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, ब्लड प्रेशर वाढतं आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.
मानवी शरीरात दोन पद्धतीचं कोलेस्ट्रॉल असतं. जर खराब कोलेस्ट्रॉल रक्तांच्या नसांमध्ये जमा होऊ झालं तर त्यामुळे नसा ब्लॉक होतात. अशावेली हार्ट अॅटॅकचा धोका वाढून परिस्थितीत जीवावर बेतू शकते. खराब कोलेस्ट्रॉल निघून जावं यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत.
एका रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, 20 पेक्षा जास्त वयाच्या महिला आणि पुरुषांमध्ये एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल 100 मिलीग्रॅम पेक्षा कमी असली पाहिजे.