मुंबई : बर्थ कंट्रोल करण्यासाठी सध्या विविध पर्याय महिलांकडे उपलब्ध असतात. यामध्ये बर्थ कंट्रोलसाठी तुम्ही फक्त गोळ्याचाच वापर करू शकता असं नाही. मात्र गर्भधारणा टाळण्यासाठी नैसर्गिक पद्धती देखील वापरू शकता. त्यामुळे तुम्हालाही आता आई व्हायचं नसेल तर यासाठी आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. नैसर्गिकरित्या गर्भधारणा रोखण्याच्या या पद्धतीला 'रिदम मेथड' म्हणतात.
रिदम मेथडला कॅलेंडर मेथड देखील म्हटलं जातं. गर्भधारणा टाळण्यासाठी रिदम मेथड हा एकमेव मार्ग आहे, ज्यामध्ये स्त्रीला तिच्या मासिक पाळी आणि प्रजनन कालावधीचा ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे. स्त्रिया महिन्याच्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त प्रजननक्षम असतात, म्हणजेच त्या वेळी गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते.
जर तुम्हाला गर्भधारणा नको असेल नसेल, तर फर्टाइल कालावधीत सेक्स करण टाळावं पाहिजे. अनेक स्त्रिया ज्या फर्टिलिटी पीरियडमध्येही लैंगिक संबंध ठेवतात आणि यानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी या दिवसांत गर्भनिरोधक गोळ्या घेतात.
रिदम मेथडमध्ये स्त्रीला तिचं ओव्हुलेशन कधी होणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचे असतं. मासिक पाळीत ओव्हुलेशन ही अशी वेळ असते जेव्हा तुमच्या अंडाशयातून एग रिलीज होतात. या काळात सेक्स केल्याने स्पर्म एगला फर्टिलाइज करतात, ज्यामुळे तुम्ही गर्भवती होऊ शकता.
प्रत्येक महिन्यात असे काही दिवस असतात ज्या दरम्यान महिला फर्टाइल असतात. अशा स्थितीत रिदम पद्धतीचा वापर करणाऱ्या महिलांना महिन्यातील कोणते दिवस फर्टाइल होतील हे जाणून घेण्यासाठी त्यांची शेवटची मासिक पाळी येण्याच्या वेळेवर लक्ष ठेवावं लागेल.
एकदा फर्टिलिटी डेज कळले की, महिला या काळात लैंगिक संबंध ठेवायचे की नाही हे ठरवू शकतात. ज्यांना गरोदर राहायचं नाही, ते या काळात कंडोम वापरू शकतात.
असे अनेक मार्ग आहेत, ज्याद्वारे महिला त्यांच्या प्रजननक्षमतेवर लक्ष ठेवू शकतात. साधारणपणे, महिलांना 28 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते, परंतु कधीकधी हा कालावधी 21 ते 35 दिवसांपर्यंत असू शकतो.