मुंबई : COVID-19 Nasal Spray: आता कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी. आता दोन दिवसांत कोरोना व्हायरस नष्ट होणार आहे. मुंबईतील ग्लेनमार्क या कंपनींने कोरोनावर एका 'नेझल स्प्रे'ची (Nasal Spray) निर्मिती केली आहे. ग्लेनमार्क आणि सॅनोडाईझ या कंपन्यांनी एकत्र येऊन हे औषध तयार केले आहे.
नाकात सोडण्यात येणाऱ्या या औषधामुळे कोरोना विषाणू 48 तासाच्या आत नष्ट होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. निरिक्षणातून एका दिवसांत 94 टक्के आणि दोन दिवसांत 99 टक्के कोरोना विषाणूचा नायनाट झाल्याचे आढळून आले आहे. पुढच्या आठवड्यात हा स्प्रे बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतात या 'नेझल स्प्रे'ची किंमत 850 रुपये आहे.
देशभरातील 20 रुग्णालयांमध्ये अनुनासिक स्प्रेची कोरोना संक्रमित रुग्णांवर चाचणी करण्यात आली. या दरम्यान, सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना संक्रमित (ज्यांनी लस घेतली आहे) आणि लस न घेलेल्या कोरोना रुग्णांना स्वतंत्र गटात ठेवण्यात आले होते. एकाला नाकातून स्प्रे म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड नाकातून, तर दुसऱ्या गटाला प्लेसबो देण्यात आले. सात दिवसांनंतर निकालांचा आढावा घेतला असता परिणाम दिसून आला. COVID-19 ची सौम्य लक्षणे असलेल्या 306 प्रौढांमध्ये करण्यात आले. 'द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालांमध्ये हे उघड झाले आहे.
संशोधनात असे आढळून आले की NONS प्राप्त करणार्या उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांमध्ये 24 तासांच्या आत व्हायरल लोडमध्ये लक्षणीय घट झाली, जी उपचारांच्या 7 दिवसांपर्यंत टिकून राहिली. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे की NONS सह उपचारानंतर 24 तासांच्या आत व्हायरल लोड 93.7 टक्के आणि 48 तासांच्या आत 99 टक्के कमी झाले. लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या गटांमध्ये समान परिणाम दिसून आले.