मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून नियमित योगा अभ्यास करतात.
योगाला जागतिक स्तरावर आता खास मानाचं स्थान मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्याच्या फीटनेसच्या रहस्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी आज अॅनिमेटेड स्वरूपातील पदहस्तासनाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
नरेंद्र मोदी हे फीटनेस फ्रीक आहेत. पहिल्या जागतिक योग दिनी त्यांनी सर्वसामान्यांसोबत येऊन योगासनं केली होती. त्याआधी समाजात जागृती निर्माण होण्यासाठी काही प्रात्यक्षिकं शेअर केली होती. मात्र आता योगामध्ये लोकांची रूची आणि जागृती वाढवण्यासाठी 'अॅनिमेटेड व्हिडिओ'चा नवा पर्याय त्यांनी चाहत्यांसमोर आणला आहे.
Making Padahastasana a regular part of your lives will make your body healthier and your mind calmer. What more can one ask for! pic.twitter.com/eOe5SxybHV
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2018
पद म्हणजे पाय आणि हस्त म्हणजे हात. पदहस्तासनामध्ये या दोहोंचा मिलाप होतो. पदहस्तासनामुळे मन शांत राहते आणि शरीर अधिक आरोग्यदायी होते.
हार्मस्ट्रिंग म्हणजेच गुडघ्याच्या मागच्या दोन्ही स्नायूंना जोडणारा बारीक स्नायू तसेच पोटर्यांच्या स्नायूंवर ताण येतो.
पायांच्या बोटांपासून मेंदूपर्यंत होणारा रक्तप्रवाह सुधारतो.
पोटाजवळील स्नायूंवर दाब आल्याने पचनाचे विकारही दूर राहतात.
कमरेपासून सारे शरीर खाली झुकल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते परिणामी चेहर्यावरील कांती सुधारते.
प्रामुख्याने लहान मुलांनी नियमित या आसनाचा सराव केल्यास त्यांची उंची वाढण्यास मदत होते.
शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने डोकेदुखी व निद्रानाशाची समस्या कमी होते.