दिलासादायक! मुंबईत सलग 6व्या दिवशी 300 पेक्षा कमी कोरोनाच्या रूग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत 11 लाख 22 हजार 109 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.

Updated: Jul 22, 2022, 06:28 AM IST
दिलासादायक! मुंबईत सलग 6व्या दिवशी 300 पेक्षा कमी कोरोनाच्या रूग्णांची नोंद title=

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या साथीच्या 273 नवीन रुग्णांची नोंद झालीये. यावेळी एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 11 लाख 22 हजार 109 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या आता 19 हजार 636 वर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 6 दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या 300 पेक्षा कमी आहे. 

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 338 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. त्यानंतर शहरात आतापर्यंत 11 लाख 536 लोकांनी कोरोनावर मात केलीये. आता मुंबईत एक्टिव्ह रुग्णांची संख्या 1937 आहे. 

आरोग्य विभागाने एका निवेदनात म्हटलंय आहे की, दिवसभरात 2,400 रुग्ण संसर्गातून बरे झालेत, त्यानंतर संसर्गमुक्त झालेल्या लोकांची संख्या 78,64,831 वर पोहोचली आहे. राज्यात संसर्गमुक्तीचा दर 97.97 टक्के आहे तर मृत्यूदर 1.84 टक्के आहे.