पावसात भिजून ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर या '5' गोष्ट तात्काळ कराच !

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Updated: Jul 10, 2018, 05:32 PM IST
पावसात भिजून ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर या '5' गोष्ट तात्काळ कराच !  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र ऊन, पावसातून वाट काढून अनेक मुंबईकर चाकरमान्यांना त्यांचं ऑफिस गाठणं महत्त्वाचं असतं. पावसात भुजून तुम्ही ऑफिसमध्ये पोहचलात तरीही तुम्हांला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण भिजून ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर एसीमध्ये पुढील काही तास तसेच बसणं तुम्हांला त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच पावसात भिजून ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्यायला विसरू नका. पावसात भिजलेले शूज झटपट सुकवणार्‍या 4 खास ट्रिक्स

कोणती काळजी घ्याल ? 

केस सुकवा - 

अनेकदा पाऊस आणि वारा एकत्रच असल्याने छत्री घेऊनही तुम्ही मुंबईच्या पावसात भिजणं अटळ असतं. त्यामुळे पावसात भिजून ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर केस कोरडे करायला विसरू नका. नॅपकीन किंवा टिश्यू पेपरने केस नीट पुसा. ओले केस बांधून ठेवू नका. थोडा वेळ केस मोकळे सोडा. 

कपडे - 

पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत किंवा ऑफिसमध्ये एक कपड्याचा जोड ठेवा. खूप भिजले असाल तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर कपडे सुकवा.  पावसाळ्यात कपड्यांना येणारा वास दूर करण्यासाठी खास ५ टिप्स...

पाय - 

पावसाळ्याच्या दिवसात साचलेल्या पाण्यातून रस्ता काढणं अनिवार्य असतं. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून रस्ता काढून तुम्ही चालला असाल तर  ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर पाय स्वच्छ धुवायाला विसरू नका. साचलेल्या पाण्यातुन चालल्याने काही साथीचे आजार, इंफेक्शन पसरण्याचा धोका असतो. ... म्हणून मधुमेहींसाठी पाऊस आणि साचलेल्या पाण्यातून चालणं धोकादायक

हात स्वच्छ ठेवा - 

पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका झपाट्याने वाढतो. अशावेळेस वेळोवेळी हात स्वच्छ करायला विसरू नका. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. सोबतच तुम्हांला फ्लू, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास इतरांना शेक हॅन्ड करणं टाळा. यामुळे नकळत तुम्ही इंफेक्शन वाढवत आहात. पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी या '5' पदार्थांपासून दूरच रहा !

आहाराचं पथ्यपाणी - 

पावसाळ्याच्या दिवसात ब्रेकफास्ट टाळू नका. सोबतच या दिवसात सतत वॉशरूमला जावं लागत म्हणून पाणी पिण्याचं प्रमाण कमी करू नका. उघड्यावरचं खाणं टाळा, सोबतच शुद्ध, गाळलेलं, उकळलेलं पाणी प्या. फळं खाण्यापूर्वीदेखील ती नीट धुवून खाणं गरजेचे आहे.