मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मुंबईमध्ये 20 हजारांहून अधिक रूग्ण सापडले आहेत. यामुळे आरोग्य विभाग पुन्हा चिंतेत आहे. मात्र 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.
फ्रंटलाई वर्कर्स आणि 60 वर्षांवरील ज्या व्यक्तींना इतर आजार आहेत अशांना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींना कोविनच्या पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या व्यक्ती तिसऱ्या लसीसाठी पात्र आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन बूस्टर डोस घ्यावा.