Monsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा

Monsoon Restricted Foods : असे बरेचशे खाद्यपदार्थ आहेत जे सामान्य दिवसात खूप फायदेशीर मानले जातात, पण पावसाळ्यात त्यांचं सेवन धोकादायक ठरू शकतं.

Updated: Jul 16, 2022, 06:55 PM IST
Monsoon Diet: पावसाळ्यात 'हे' पदार्थ ठरु शकतात आरोग्यासाठी घातक..जाणून घेण्यासाठी वाचा title=

Monsoon Restricted Diet : पावसाच्या थेंबामुळे मनाचा कोपरा ओला होतो त्याचं कारण म्हणजे कडक उन्हानंतर मान्सूनचं आगमन झाल्यालं असतं. अनेकांना पावसाळा आवडतो, कारण त्यामुळे तापमानात घट दिसून येते आणि वातावरण प्रसन्न होतं, पण पावसामुळे अनेक आजार आणि संसर्ग देखील होतात. म्हणूनच या काळात आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी, विशेषतः खाण्यापिण्याची निवड विचारपूर्वक करणं फार आवश्यक असतं.

पावसाळ्यात 'या' पदार्थांपासून दूर रहा..

 

1. मांसाहारी पदार्थ
सनातन धर्मात सावन महिन्यात मांसाहार करण्यास मनाई आहे, पण यामागं एक शास्त्रीय कारण आहे, खरं तर पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्ग, बुरशी आणि मांस कुजण्याचा धोका वाढतो, त्याचं कारण म्हणजे थेट सूर्यप्रकाश मिळत नाही.

2. हिरव्या पालेभाज्या
पावसाळ्यात विशेषतः हिरव्या पालेभाज्या टाळल्या पाहिजेत, मग त्यात कितीही पोषक घटक असले तरीही. पावसाळ्यात ओलावा थोडासा वाढतो, ज्यामुळे जंतू वाढण्यास मदत होते, ते पालेभाज्यांवर देखील हल्ला करतात आणि यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येतं.

3. दही
दही हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यामूळे पचनक्रिया सुरळीत ठेवली जाऊ शकते, पण पावसाळ्यात ते खाऊ नये. त्याच कारण ही एक थंड गोष्ट आहे, यामुळे सर्दी आणि घसा दुखू शकतो.

4. दूध
पावसाळ्यात किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि त्यामुळे डेंग्यू-चिकुनगुनियाचे डास वाढू लागतात. याचा परिणाम दुभती जनारांवर होतो आणि ते आजारी पडतात, त्यामुळे या जनावरांचं दूध पिल्याने आजार होण्याची शक्यता जास्त असते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)