रक्त आणि throat swab मध्ये सापडला Monkeypox virus, उपचारांवर लॅन्सेटचा रिसर्च

इतक्या मोठ्या प्रमाणावर मंकीपॉक्स कधीच पसरला नसल्याचा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.

Updated: May 26, 2022, 06:28 AM IST
रक्त आणि throat swab मध्ये सापडला Monkeypox virus, उपचारांवर लॅन्सेटचा रिसर्च title=

मुंबई : कोरोनानंतर जगभरात आता मंकीपॉक्सची भीती दिसून येतेय. आतापर्यंत, युरोपियन देशांमध्ये मंकीपॉक्सची सुमारे 100 प्रकरणं आढळून आलीयेत. दरम्यान, लॅसेंट रिसर्चने रक्त आणि घशातील स्वॅबद्वारे मंकीपॉक्सचा व्हायरस मिळाला असल्याचं सांगितलं आहे.  

यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर मंकीपॉक्स कधीच पसरला नसल्याचा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. अहवालात असंही म्हटलंय की, काही अँटीव्हायरल औषधांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं कमी करण्याची आणि रुग्णाला संसर्ग होण्याचा कालावधी कमी करण्याची क्षमता असू शकते.

द लॅन्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2018 ते 2021 दरम्यान ब्रिटनमध्ये दुर्मिळ व्हायरसने ग्रस्त असलेल्या सात रुग्णांच्या गोष्टी समोर आल्या आहेत. या अभ्यासात व्हायरसच्या उपचारांसाठी दोन अँटीव्हायरल औषधं - ब्रिन्सिडोफोव्हिर आणि टेकोविरिमेट यांच्या पहिल्या ऑफ-लेबल वापरासाठी रुग्णाच्या प्रतिसादाचा शोध घेण्यात आला. 

मंकीपॉक्सचा व्हायरस रक्तात आणि लाळेतही आढळून आल्याचं संशोधनात आढळून आले आहे. मात्र, याआधी इतक्या मोठ्या प्रमाणावर मंकीपॉक्स कधीच पसरला नसल्याचा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. पण तरीही त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. 

यूकेच्या लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्टचे ह्यू एडलर म्हणाले की, मंकीपॉक्सवर सध्या कोणताही खास उपचार नाही आणि त्याच्या संसर्गावरील डेटा मर्यादित आहे. तर संसर्गाचा कालावधी 5 ते 21 दिवसांच्या दरम्यान आढळून आला आहे.