मुंबई : जगभरात Monkeypox ची प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसतायत. तर युरोपमध्ये धोक्याची घंटा वाजली असून रूग्णसंख्येचा आलेख वाढतेय. युरोपमध्ये आतापर्यंत सुमारे 100 मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक घेतली. यावेळी मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करायचं की नाही यावर चर्चा झाली.
Monkeypoxने युरोपातील बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटन या एकूण 9 देशांमध्ये थैमान माजवलं आहे. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये मांकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांनी चिंतेत भर पडली आहे आहे.
Robert Koch Institute चे प्रोफेसर फॅबियन यांच्या म्हणण्याप्रमाणे, ही महामारी फार काळ राहिल असं वाटत नाही. या संसर्गाच्या प्रकरणांना सहजपणे आयसोलेट केलं जाऊ शकतं. एकाच ठिकाणी प्रतिबंधित केली जाऊ शकतात. लस देखील मंकीपॉक्सचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करू शकते.
मात्र दुसरीकडे डब्ल्यूएचओचे युरोपियन प्रमुख या मांकीपॉक्सबद्दल अधिक चिंतित आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, युरोपमधील लोकांनी जास्त गर्दीच्या ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे हा संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता आहे.
युरोपियन देशांमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण 7 मे रोजी आढळून आला होता. ती व्यक्ती नायजेरियातून आली होती. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणं आफ्रिकन देशांमध्ये आढळून येतायत.