Benefits of cloves: विवाहित पुरुषांनी या वेळी 2 लवंग खाल्याने होतो जबरदस्त फायदा

Benefits of cloves: थंडीच्या मोसमात लवंग खूप फायदेशीर असते. जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...

Updated: Nov 25, 2021, 10:41 PM IST
Benefits of cloves: विवाहित पुरुषांनी या वेळी 2 लवंग खाल्याने होतो जबरदस्त फायदा title=

Benefits of cloves : आज आम्ही तुमच्यासाठी लवंगाचे फायदे घेऊन आलो आहोत. साधारणपणे याचा वापर मसाल्याच्या रूपात केला जातो, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की ते तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. लवंगात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय भाजलेल्या लवंगाची पावडर मधात मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.

लवंगात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व आरोग्यासाठी आवश्यक घटक मानले जातात.

देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या मते, लवंग ही एक अशी गोष्ट आहे, जी शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग गुणकारी आहे. ही शरीरात इंसुलिनसारखे काम करते. लवंगात रक्तदाब नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. रक्तदाबाच्या समस्येवर लवंग फायदेशीर आहे.

रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

डॉ अबरार मुलतानी यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंगा खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. लवंग पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक विकारांना प्रतिबंध होतो.

झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे फायदे

रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत २ लवंगा खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करू शकता.

लवंग पुरुषांसाठी फायदेशीर

डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. आपण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनला त्रास होऊ शकतो, म्हणून लवंग आणि त्याच्याशी संबंधित उत्पादने आयुर्वेदाचार्यांच्या देखरेखीखालीच वापरावीत.