मुंबई : आत्तापर्यंत गर्भनिरोधक गोळ्या केवळ महिलांसाठी मार्केटमध्ये मिळत होत्या. मात्र नुकतंच शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवल्या आहेत, ज्यामुळे पुरुषांच्या आरोग्याची हानी न होता जोडीदाराची गर्भधारणा रोखण्यात यश मिळू शकणार आहे.
अलीकडेच, एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आलाय की, पुरुष गर्भनिरोधकाच्या 2 गोळ्या कोणत्याही दुष्परिणामांशिवाय टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि स्पर्म्सची संख्या कमी करू शकतात. अटलांटाच्या एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत हे संशोधन सादर केला जाणार आहे.
DMAU आणि 11b-MNTDC नावाची ही दोन औषधं प्रोजेस्टोजेनिक एंड्रोजन औषधांचा भाग आहेत. सामान्यपणे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करणाऱ्या औषधांचे अनेक तोटे असल्याचं मानलं जातं. ही औषधं टेस्टोस्टेरॉन देखील कमी करतात, परंतु याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.
शरीरातील टेस्टोस्टेरोन लेवल कमी करण्यासाठी पुरुष ज्या पद्धतींचा वापर करतात, त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येतात. मात्र ज्यावेळी या औषधांबाबत संशोधन करण्यात आलं तेव्हा, असं लक्षात आलं की, पुरुष या औषधाचा पुन्हा उपयोग करण्यासाठी इच्छूक होते.
अमेरिकेतील कॅनेडी श्राइवर नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ एंड ह्यूमन डेवलपमेंटमध्ये कॉन्ट्रासेप्टिव डेवलपमेंट प्रोग्रामचे मुख्य संशोधक तामार जॅकबसन यांच्या सांगण्यानुसार, गर्भधारणा रोखण्यसाठी पुरुषांकडे नसबंदी आणि कंडोम हे पर्याय उपलब्ध आहेत. तर महिलांकडे गर्भनिरोधक गोळ्यांचा पर्याय असतो.
ते पुढे म्हणाले, पुरुषांसाठी प्रभावी गर्भनिरोधक पद्धतींचा शोध घेतल्यास पुरुष आणि स्त्रिया दोघांमधील अनैच्छिक गर्भधारणा कमी करून एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे पुरुषांना कुटुंब नियोजनातही योग्य भूमिका बजावण्यास मदत होईल. क्लिनिकल ट्रायलमध्ये पुरुषांकडून या औषधासाठी पॉझिटीव्ह रिझल्ट मिळाले आहेत.