मुंबई : जगात अनेक जण चहाचे शौकीन आहेत. उन्हाळा असो की हिवाळा चहाचा प्याला घेतल्याशिवाय अनेकांचा दिवसच जात नाही. पण अनेकांना कुल्हड चहा खूप आवडतो. अनेकदा लोकांना या मोसमात चहा प्यायला आवडतो. पण तुम्हाला माहितीये का कुल्हड चहा प्यायल्याने आपल्या आरोग्याला काय फायदा होतो. (Benifits of Kulhad chai)
कुल्हड चहामुळे (Tea) पोटात एसिड तयार होत नाही. चहा प्यायल्यानंतर गॅसची समस्या होत नाही. याशिवाय हा चहा प्यायल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येणे आणि पचनाशी संबंधित समस्यांची काळजी करण्याची गरज नाही.
स्लर्पच्या एका रिपोर्टनुसार, कुल्हड एक इको-फ्रेंडली उत्पादन आहे, ज्यामध्ये चहा प्यायल्याने पोटातील अॅसिडिटीची समस्या दूर होते. अनेकदा आपण दुकानात ज्या प्लास्टिकचे ग्लास किंवा कपमध्ये चहा पितो ते नीट धुतले जात नाहीत, त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो. पण कुल्हडमध्ये चहा प्यायल्याने संसर्गाचा धोका टाळू शकता.
प्लास्टिकच्या कपमध्ये गरम चहा दिला जातो. त्यामुळे चहामध्ये केमिकलचा प्रभाव वाढतो. जेव्हा तुम्ही मातीच्या भाजलेल्या कुल्हडमध्ये चहा पितात तेव्हा अनेक घातक रसायनांपासून तुमचा बचाव होतो. कुल्हड हे केमिकल फ्री असल्याने यात चहा प्यायल्याने आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.