कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'स्टेल्थ'ची काय आहेत वेगळी लक्षणं?

ओमायक्रॉनच्या या सब व्हेरिएंटला स्टील्थ नाव देण्यात आलेलं आहे. 

Updated: Mar 29, 2022, 03:22 PM IST
कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'स्टेल्थ'ची काय आहेत वेगळी लक्षणं? title=

मुंबई : चीन आणि युरोप या भागात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA2 मुळे ही प्रकरणं वाढत असल्याचं चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघनेने देखील य़ा व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र कोरोनाचा हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे ते पाहू.

ओमायक्रॉनच्या या सब व्हेरिएंटला स्टील्थ नाव देण्यात आलेलं आहे. स्पाइक प्रोटीनमधील काही प्रमुख उत्परिवर्तन माहिती नसल्याने याबाबत अधिक सांगणं कठीण आहे. हे उत्परिवर्तन कोरोनाच्या संक्रमणाची माहिती करून देण्यास फार महत्त्वाचं असतं. 

Stealth Omicron डेल्टापेक्षा अधिक धोकादायक?

डेल्टा कोरोना व्हायरसचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट ठरला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट खालील श्वसनमार्गावर हल्ला करून फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. ही परिस्थिती फार धोकादायक ठरू शकते.

WHOच्या मते, डेल्टा व्यतिरिक्त, ओमायक्रॉन आणि त्याचे सब व्हेरिएंट वरील भागाच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. त्यामुळेच फुफ्फुसांना गंभीर नुकसान होत असून न्यूमोनिया, चव आणि गंध कमी होणं, श्वासोच्छवासाचा त्रास, छातीत दुखणं अशी लक्षणं दिसत नाहीत.

Stealth Omicron ची लक्षणं

  • मळमळ
  • अतिसार
  • उलट्या होणं
  • पोटदुखी
  • छातीत जळजळ
  • पोट वाढणं