Women Health : ब्रेस्ट मसाज करण्याची योग्य पद्धत माहितीये का?

ब्रेस्ट मसाज करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का?

Updated: Apr 9, 2022, 03:06 PM IST
Women Health : ब्रेस्ट मसाज करण्याची योग्य पद्धत माहितीये का? title=

मुंबई : स्तनांचा मसाज करणं खूप फायदेशीर आहे. मुळात महिला सहजपणे स्वतः हा समाज करू शकता. स्तनांना मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. त्याचप्रमाणे स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हे खूप फायदेशीर आहे. नियमितपणे मसाज केल्यास स्तनांचा विकास होण्यास मदत होते. शिवाय त्यामुळे तुमचा ताण कमी होतो. पण ब्रेस्ट मसाज करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का?

महिलांना ब्रेस्ट मसाजचा फायदा तेव्हाच मिळतो ज्यावेळी योग्य पद्धतीने ब्रेस्ट मसाज केला जातो. मसाज करण्यासाठी तुम्ही सर्कुलर मोशन आणि स्मूद स्ट्रोक दोन्ही वापरून पाहू शकता. स्तनांची मालिश कशी करायची ते जाणून घ्या

  • स्तनांची मालिश करण्यापूर्वी प्रथम अंघोळ करून घ्यावी
  • स्तनांना मसाज करण्यासाठी प्रथम एका हाताची चार बोटं स्तनावर ठेवा. त्यानंतर दुसऱ्या हाताची चार बोटे स्तनाखाली ठेवा
  • यानंतर स्तनांना सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करण्यास सुरुवात करा
  • वरच्या आणि खालच्या दिशेने 20-30 वेळा मसाज करा

ब्रेस्ट मसाजचे फायदे

तणाव कमी होतो

स्तनांना मसाज केल्याने स्त्रिया त्यांचा ताण, चिंता यांची पातळी कमी करू शकतात. शिवाय तुम्हाला शांत राहण्यास मदत होते. नियमितपणे स्तनाची मालिश करून तुम्ही तणावमुक्त राहू शकता. 

ब्रेस्ट कॅन्सरची ओळख होते

स्तनांना नियमितपणे मसाज केल्याने तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असलेला ब्रेस्ट कॅन्सर ओळखू शकता. जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा स्तनांवर गाठ लागते. अशा स्थितीत स्तनाचा नियमित मसाज केल्यावर तुमच्या हाताला ही गाठ लागू शकते. याने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखता येतो.