तुमच्या वाईट सवयीच करतायत तुमच्या ओठांचे नुकसान, त्या आताच थांबवा

तुम्हाला माहितीय का, की तुमच्या चुकीच्या सवयी खरंतर तुमचे ओठ काळे करण्यासाठी कारणीभूत आहेत.

Updated: Jul 11, 2022, 09:36 PM IST
तुमच्या वाईट सवयीच करतायत तुमच्या ओठांचे नुकसान, त्या आताच थांबवा title=

मुंबई : अनेकदा स्त्रिया आपल्या ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक शेड्स किंवा लिपग्लॉस इत्यादींचा अवलंब करतात. सध्या बाजारात ओठांना हायड्रेट करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. त्यात हल्ली मुलींना आपले ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी असावे असे वाटते. ज्याच्यासाठी ते वेगवेगळ्या प्रोडक्टवर खर्च देखील तेवढाच करतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की तुमच्या चुकीच्या सवयी खरंतर तुमचे ओठ काळे करण्यासाठी कारणीभूत आहेत, त्यामुळे तुम्ही जर त्या सवयी बदलल्या तर तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची देखील गरज नाही.

आम्ही तुम्हाला ओठ काळे होण्यामागील काही कारणं सांगणार आहोत

लोकल लिपस्टिक वापरणे

ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिक महत्त्वाची भूमिका बजावते. पण काही पैसे वाचवण्यासाठी स्त्रिया लोकल लिपस्टिक खरेदी करतात, ज्या खूप कमी किंमतीत तर मिळतात, परंतु ते तुमचे ओठ खराब करतात. त्यामुळे लोकल लिप्स्टीक बिल्कूल वापरु नका.

एक्स्पायरी डेट लिपस्टिक वापरणे

काही स्त्रिया जेव्हा लिपस्टिक विकत घेतात तेव्हा ती वर्षानुवर्षे वापरतात, अशावेळी त्या याची एक्सपायरी डेट पाहात नाही. तसेच काही महिलांना लिपस्टिकचा शेड आवडतो आणि तो पुन्हा मिळत नाही, म्हणून ते एक्सपायरी झालेली लिपस्टीक लावतात. ज्यामुळे तुमच्या ओठांना इजा होतात.

उन्हात किंवा सुर्याच्या किरणांशी संपर्कात येणे

काही स्त्रिया आधी मेकअप करतात आणि नंतर बाहेर जातात. पण लिपस्टिकचा वापर उन्हात करू नये. कारण त्यामुळे ओठ काळे पडण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)