लहान मुलांच्या लसीकरणासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने मागितली चाचणीची परवानगी

लवकरच देशातील लहान मुलांसाठी अजून एक लस येणार आहे.

Updated: Aug 20, 2021, 01:33 PM IST
लहान मुलांच्या लसीकरणासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने मागितली चाचणीची परवानगी title=

मुंबई : देशावरून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. सध्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. मात्र या परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच देशातील लहान मुलांसाठी अजून एक लस येणार आहे. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारतातील 12-17 वयोगटातील कोविड लसीच्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मंगळवारी अर्ज सादर केला आहे अमेरिकन फार्मा कंपनीने सांगितलं की, मुलांसाठी लसीची गरज लक्षात घेऊन, 17 ऑगस्ट रोजी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडे अर्ज पाठवला असून 12-17 वर्षे वयाच्या मुलांसाठी लसीच्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल-डोस कोरोना लस भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. भारतात मंजूर होणारी ही पाचवी आणि पहिली सिंगल डोस लस आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सन वगळता भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या पाच लसींमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना लस यांचा समावेश आहे. कोवॅक्सिन, कोविशील्ड, मॉडर्ना आणि स्पूतनिक-वी या चारही लसींचे दोन डोस घ्यावे लागतातय तर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही सिंगल-डोस लस असणार आहे