Coronavirus: सर्टिफिकेट बनावट आहे की नाही? या सोप्या पद्धतीने तपासा!

 भारतात कोरोना लस प्रमाणपत्राबाबत गोंधळ उडाला.

Updated: Sep 24, 2021, 03:21 PM IST
Coronavirus: सर्टिफिकेट बनावट आहे की नाही? या सोप्या पद्धतीने तपासा! title=

दिल्ली : कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रथम आपण सर्टिफिकेट मिळालं का हे चेक करतो. भारतात कोरोना लस प्रमाणपत्राबाबत गोंधळ उडाला. यापूर्वी ब्रिटनने कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना लसीकरण मानण्यास नकार दिला होता, परंतु भारताच्या दबावापुढे आपला निर्णय मागे घेतला. यानंतर आणि नंतर म्हटलं की भारताच्या कोविशील्ड लसीमध्ये नाही तर प्रमाणपत्राबाबत समस्या असल्याचं सांगितलं.

ब्रिटनने कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. परंतु जुन्या अटी त्यांना लागू राहतील. म्हणजेच, पूर्णपणे लसीकरण झालेल्या भारतीयांना ब्रिटनमध्ये गेल्यानंतर 10 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. तसंच त्यांना त्यांचा कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. 

सोप्या भाषेत सांगायचं तर भारताच्या लस प्रमाणपत्राच्या सत्यतेबद्दल ब्रिटनला शंका आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमच्याकडे देखील लसीचं प्रमाणपत्र आहे, तर प्रमाणपत्र बनावट नाही ना हे तुम्हाला कसं कळेल?

अशा पद्धतीने करा सर्टिफिकेटची खात्री

  • सर्वात पहिलं कोविनच्या ऑफिशियल वेबसाइडवर verify.cowin.gov.in/ वर जा
  • यानंतर वेरीफाय सर्टिफिकेटवर Verify a vaccination certificate च्या ऑप्शनवर क्लिक करा
  • तुम्ही इथे क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फोनवर कॅमेरा उघडण्याची सूचना मिळेल. ज्याला तुम्हाला परवानगी द्यावी लागेल. 
  • कागदावर किंवा डिजिटल सर्टिफिकेटवर कॅमेरा QR कोड दाखवून स्कॅन करा.
  • क्यूआर कोड स्कॅन केल्यावर, एक ऑथेंटीक लस प्रमाणपत्र 'Certificate Successfully Verified' दिसेल.
  • जर तुमचं सर्टिफिकेट खरं नसेल तर 'Certificate Invalid' असं येईल.

चेक पॉईंट नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीने बनावट कोविड लस प्रमाणपत्रांचं काळ्या बाजाराचा शोध घेण्यासाठी एस अभ्यास केला, ज्यामध्ये असं आढळून आलं की बनावट लस प्रमाणपत्रे जगातील 29 देशांमध्ये तयार केली जात आहेत. यामध्ये ऑस्ट्रिया, ब्राझील, लाटविया, लिथुआनिया, माल्टा, पोर्तुगाल, सिंगापूर, थायलंड, यूएई सारख्या देशांचा समावेश आहे.