मुंबई : पूर्वीच्या काळी मोठी मंडळी लहान मुलांच्या डोळ्यात काजळ लावायचे. त्यांचा विश्वास होता की, काजल लावल्याने मुलांचे डोळे सुंदर आणि मोठे होतात. यासोबतच डोळ्यांच्या सर्व समस्याही दूर होतात. परंतु आजच्या काळात डॉक्टरांचे मत याबद्दल पूर्णपणे उलट आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की मुलांच्या डोळ्यांची ठेवण आणि आकार हा पालकांशी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीशी संबंधित आहे. डॉक्टर काजळला मुलांसाठी हानिकारक मानतात.
जुन्या लोकांचा असा विश्वास आहे की, घरगुती काजल नैसर्गिक घटकांपासून बनवली जाते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि मुलांच्या डोळ्याला ते लावल्याने त्यांना खूप फायदा होतो. पण तज्ज्ञांचे मत आहे की, घरगुती काजळ हे व्यावसायिक काजळापेक्षा चांगली असू शकते, पण त्यात कार्बन देखील आहे, जे मुलांसाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण करू शकते.
मोठी मंडळी म्हणायचे की, डोळ्यांमध्ये काजल लावल्याने दृष्टी वाढते, पण तसे काही पुरावे नाहीत. तज्ञ हे एक संपूर्ण समजूत असल्याचं म्हणतात. त्यांचा असा विश्वास आहे की, जर काजळामुळे दृष्टी चांगली होत असले. तर ज्या प्रत्येक व्यक्तीची दृष्टी कमी आहे त्याला काजळ लावण्याचा सल्ला दिला जाईल.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मुलांचे डोळे मऊ असतात, अशा स्थितीत जेव्हा त्यांना बोटाने काजळ लावले जाते तेव्हा संक्रमणाचा धोका वाढतो. याशिवाय अनेक वेळा मुलांना आंघोळ करताना काजळ मुलांच्या डोळ्यांच्या आणि नाकाच्या आत जातो. यामुळे, डोळ्यांमध्ये जळजळ होते आणि कधीकधी नाकातील लहान छिद्र बंद होण्याचा धोका असतो.
दररोज काजळ लावल्यामुळे डोळ्याला त्रास होतो. लहान मुलांना खाज येते. यामुळे बाजारातील काजळाचा वापर केल्यास ते धोकादायक ठरू शकते.