वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा पर्याय निवडावा का?

इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतंय का?

Updated: Apr 29, 2022, 03:50 PM IST
वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा पर्याय निवडावा का?  title=

मुंबई : तुम्हीही वजन कमी करताय? वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा पर्याय निवडलाय? मात्र इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतंय का? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने तुमच्या वजनात घट होण्यास मदत होते. मात्र तुम्हाला याची योग्य पद्धत माहिती असेल तर..

कमीत कमी 14 तास उपाशी रहावं

या फास्टिंगमध्ये तुम्हाला कमीत कमी 14 तास उपाशी रहावं लागेल. मात्र यामध्ये तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. यामध्ये तुम्ही डिटॉक्स ड्रिंक्सचाही वापर करू शकता. इंटरमिटेंट फास्टिंगसाठी तुम्हाला रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळच्या ब्रेकफास्टचा टाईम ठरवू शकता. 

कसे होतात याचे फायदे

अनेक अभ्यासातून असं समोर आलं आहे की, इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने तुमचं वजन वेगाने कमी होतं. शिवाय या फास्टिंगमुळे हृदयाचं आरोग्य सुरक्षित राहतं तसंच ब्रेन इम्प्रूव्ह होतो. 

शरीरातील इम्युनिटी वाढवण्यास मदत होते

इंटरमिटेंट फास्टिंगवेळी तुम्हाला एक फिक्स डाएट फॉलो केलं पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही पुरेश्या प्रमाणात प्रोटीम आणि फायबरचं सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होणार नाही. इंटरमिटेंट फास्टिंग लाभदायक ठरू शकतं कारण तुमची इम्युनिटी वाढवण्यासंही मदत करतं.