तुमच्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी एक उपाय

तुमच्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी एक उपाय शोधून काढण्यात आला आहे, त्याच्यासाठी त्यांच्या झोपेची सवय बदलणे आवश्यक आहे.

Updated: Nov 16, 2018, 06:41 PM IST
तुमच्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी एक उपाय title=

मुंबई : तुमच्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी एक उपाय शोधून काढण्यात आला आहे, त्याच्यासाठी त्यांच्या झोपेची सवय बदलणे आवश्यक आहे.

हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर’ (एडीएचडी) चा प्रभाव यात महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.

 मडरेक चिल्ड्रेंन्स रिसर्च इंन्स्टीट्यूट (एमसीआरआई)च्या रिसर्चनुसार, ज्या मुलांना झोपेबाबत काही तरी समस्या आहेत, अशा ७०% मुलांमध्ये एडीएचडी हे लक्षण आढळून आले आहे. या रिसर्चचे मुख्य संशोधक मेलिस्सा मुलरेनीच्यानुसार,  तुमच्या मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करा, एडीएचडी पीडित मुलांमध्ये ही समस्या काही काळापर्यंत टिकून राहू शकते.

 या रिपोर्टनुसार,  'ज्या मुलांमध्ये चांगल्या सवयी असतात, ते दिवसा भांडत नाहीत, ते रात्री चांगली झोप घेतात, तसेच ते खूप अलर्ट राहतात आणि कमी वेळ झोपतात, जर तुम्ही चांगली झोप घेऊ लागले तर तुम्हाला कोणत्याही समस्या येत नाहीत, आपल्या शरीरात एक प्रकारचं घड्याळ असतं, ते आपल्याला झोपेचं संकेत देतं, प्रकाश, तापमान, जेवणाच्या वेळा यांचे संकेत आपल्याला मिळत असतात'.