फॅमिली प्लॅनिंग करताय तर या गोष्टी नक्की वाचा!

एका पेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या पालकांना अनेक अनुभवांना सामोर जावं लागतं. काही लोकं दोन मुलांच्या जन्मामध्ये अधिक अंतर ठेवत नाहीत. तर काही व्यक्ती दोन मुलांच्या वयामध्ये अंतर ठेवण्याचा विचार करतात जेणेकरून पहिल्या मुलाच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकतील. फॅमिली कशी तयार करायची आणि मुलांमध्ये किती अंतर असलं पाहिजे या संपूर्ण पालकांचा निर्णय असतो.

Updated: Jul 29, 2021, 02:52 PM IST
फॅमिली प्लॅनिंग करताय तर या गोष्टी नक्की वाचा! title=

मुंबई : एका पेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या पालकांना अनेक अनुभवांना सामोर जावं लागतं. काही लोकं दोन मुलांच्या जन्मामध्ये अधिक अंतर ठेवत नाहीत. तर काही व्यक्ती दोन मुलांच्या वयामध्ये अंतर ठेवण्याचा विचार करतात जेणेकरून पहिल्या मुलाच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकतील. फॅमिली कशी तयार करायची आणि मुलांमध्ये किती अंतर असलं पाहिजे या संपूर्ण पालकांचा निर्णय असतो.

दरम्यान मुलांच्या वयामध्ये अंतर जास्त असणं किंवा कमी असणं या दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. पालकांना जर दोन मुलांच्या जन्माच्या गॅपमध्ये गोंधळ उडत असेल तर वैद्यकीय तज्ञांचा काही सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल.

अभ्यासानुसार, दोन गर्भधारणेदरम्यान किमान 18 महिन्यांचे अंतर असलं पाहिजे. तर दुसरीकडे, बरेच आरोग्य तज्ज्ञ दोन गर्भधारणेदरम्यान 18-24 महिन्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस करतात. डॉक्टर म्हणतात की, 18 महिन्यांपेक्षा कमी वेळात दुसरी गर्भधारणा झाली तर बाळा लवकर जन्माला येऊ शकतं. तसंच बाळाचं वजनंही कमी असण्याची शक्यता असते.

जर पहिल्या बाळाच्या वेळी ऑपरेशन झालं असेल तर त्वरित दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग आईच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गर्भधारणेदरम्यान अंतर नसल्यामुळे, ऑपरेशनचे टाके पूर्णपणे सुकलेले नसतता आणि दुसर्‍या प्रसूतीदरम्यान तो कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता असते. 

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, दोन मुलांच्या वयामध्ये असणारा फरक हा पालकांच्या वयावर तसंच त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर देखील अवलंबून असतो. 18 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या दोन बाळांना हाताळणं हे बर्‍याचदा पालकांसाठी एक आव्हान असतं. 

आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पहिलं बाळ आणि दुसरं बाळं यांच्यामध्ये तीन वर्षाचं अंतर असणं योग्य मानलं जातं. दोघांमध्ये 3 वर्षांचं अंतर असेल तर पहिलं मूल स्वतःची काम स्वतः करू शकतं.