'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा

दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो. 

Updated: Jun 1, 2018, 01:42 PM IST
'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा  title=

मुंबई : दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो. त्यामुळे नियमित ब्रश करूनही दातांवर दिसणारा पिवळेपणा तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतो. केवळ दातांचा पिवळेपणा नव्हे तर इतर काही समस्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणं अधिक फायदेशीर आहे. मात्र  सौम्य प्रमाणात दातांवर पिवळेपणा असल्यास काही घरगुती उपचारांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. 

मोहरीचं तेल फायदेशीर - 

मोहरीच्या तेलाचे तोंडाचं आरोग्य जपण्यासाठी मदत होऊ शकते. यामुळे हिरड्यांचं आरोग्य जपणं शक्य आहे. मीठ आणि मोहरीच्या तेलाचं मिश्रण दातांवरील पिवळेपणा कमी करण्यास मदत करतो. नियमित दात मीठाने  स्वच्छ केल्यास ते अधिक चमकदार होण्यास मदत होते. 

दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासोबतच प्लाकचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मोहरीचं तेल आणि मीठ मदत करते. 

तोंडात अस्वच्छता वाढल्यास त्यामध्ये बॅक्टेरियादेखील वाढण्याची दाट शक्यता असते. अशावेळेस मोहरीचं तेल आणि मीठाचे मिश्रण तोंडाच्या आरोग्याशी निगडीत इतर समस्यांही आटोक्यात ठेवतात. हिरड्यांवरील सूज, रक्तस्त्राव आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. 

कसा कराल हा उपाय?

दातांवरील पिवळेपणा हटवण्यासाठी अर्धा चमचा मोहरीचं तेल, चमचाभर हळद, अर्धा चमचा रॉक सॉल्ट हे मिश्रण एकत्र करावे. दातांवरील पिवळेपणा हटवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळेस ही पेस्ट लावून दात स्वच्छ करावेत.