मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये ऑक्सिमीटर रूग्णांसाठी एक संजीवनी ठरलं आहे. ऑक्सिमीटरच्या माध्यमातून आपली ऑक्सिजन लेवर तसंच हार्ट रेट समजण्यास मदत होते. मात्र ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन लेवल तपासत असताना त्याच्या योग्य पद्धतीने वापर करणं फार महत्त्वाचं असतं. दरम्यान सरकार देखील ऑक्सिमीटरच्या वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतंय.
दरम्यान ऑक्सिमीटरचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे.
ऑक्सिजन लेवल तपासत असताना चित्त शांत ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तपासणी करत असताना कमीत कमी 15 मिनिटं शरीराला पूर्णपणे आराम द्यावा.
ऑक्सिजन लेवल चेक करत असताना आपलं बोटं हृदयाच्या समोर असलं पाहिजे. तसंच तपासणी करत असताना हालचाल करणं टाळावं.
ऑक्सिजनची लेवल तपासताना इंडेक्स किंवा मिडल फिंगरचा वापर करा. बोटाच्या नखाच्या थोड्या वरील त्वचेला स्पर्श होईल अशा पद्धतीने ऑक्सिमीटर लावावं.
ऑक्सिजन लेवल तपासत असताना ऑक्सिमीटर हलणार नाही याची काळजी घ्या.
दररोज दिवसातून 2-3 वेळा ऑक्सिजनचं रिडींग घेतलं गेलं पाहिजे. शिवाय ऑक्सिजन लेवल 92 च्या खाली असल्यास डॉक्टरांना तातडीने संपर्क करा.